Successful Farmer : चर्चा तर होणारच! नोकरीत मन नाही लागलं, दोन्ही सक्ख्या भावांनी सुरु केली शेती, आज दोन्ही मिळून करताय 15 कोटींची उलाढाल

Successful Farmer : भारतात अलीकडे नवयुवक सुशिक्षित तरुण शेतीमध्ये (Farming) भविष्य शोधण्यासाठी तसेच आपले करिअर घडविण्यासाठी येत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे हे सुशिक्षित तरुण आपल्या ज्ञानाचा उपयोग करून शेतीमध्ये करोडोंची कमाई (Farmer Income) देखील करत आहेत.

आज आम्ही तुम्हाला अशाच दोन तरुणांची गोष्ट सांगणार आहोत ज्यांनी शेतीमध्ये उतरून करोडोंची कमाई करून दाखवली आहे. मित्रांनो खरं पाहता चांगला अभ्यास करूनही या तरुणांना नोकरी मिळाली नाही, म्हणून त्यांनी शेतीतच (Modern Farming) भविष्य घडवण्याचा विचार केला. त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी विशेष फायद्याचा सिद्ध झाला असून आजच्या घडीला हे दोन्ही तरुण शेती व्यवसायातून (Agriculture Business) करोडो रुपये कमवत आहेत.

जाणून घ्या दोन्ही तरुणांबद्दल….

आज आपण ज्यांच्याबद्दल बोलत आहोत ते आहेत शशांक भट्ट आणि अभिषेक भट्ट. उत्तर प्रदेश ची राजधानी लखनौचे रहिवासी असलेले हे दोन तरुण सक्खे भाऊ आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात काहीतरी मिळवण्याच्या इच्छेने शेतीचा (Farmer) मार्ग निवडला आहे. त्यामुळे दोघांची वेगळी ओळख झाली. जसे प्रत्येक तरुणाला चांगल उच्चशिक्षण मिळवायच असतं. त्याचप्रमाणे शशांक यांनी एमबीए केले तसेच अभिषेक यांनी बीटेक केले.

नोकरीत मन लागले नाही….

शिक्षण पूर्ण करून शशांकला नोकरी लागली. जे तो करू लागला पण त्याची इच्छा वेगळी होती, त्याला काहीतरी हवे होते ज्यामुळे त्याचे आणि त्याच्या आई-वडिलांचे नाव रोशन होईल. काहीतरी वेगळं करायचं म्हणून शशांक यांनी नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर त्याला असे काहीतरी करायचे होते ज्यामुळे त्याचे नाव होईल. अखेर बराच विचारविनिमय करून त्यांनी कृषी क्षेत्रात पाऊल ठेवले. आता कृषी क्षेत्रात विकास होत असल्याने त्यांनी शेतीचे क्षेत्र निवडले आणि त्यामुळे आता यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.

शेतीसाठी पालक राजी नव्हते

ज्या पालकांनी आपल्या मुलांना चांगले उच्च शिक्षण मिळवून दिले आहे त्या पालकांची त्यांच्या मुलांनी चांगली नोकरी करावी अशीच इच्छा राहणार आहे. शशांक आणि अभिषेक यांच्या पालकांना देखील असंच काहीसं वाटत होतं. मात्र त्यांच्या मुलांनी नोकरी सोडून कृषी क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांना हे मान्य नव्हते. अशा परिस्थितीत शेती करणं सुरुवातीच्या टप्प्यात शशांकला खूप अवघड जात होतं, पण त्यांनी त्यावेळी जिद्द सोडली नाही. दोन्ही भाऊ शेतीच्या कामात गुंतले. त्यानंतर हळूहळू त्याच्या कुटुंबीयांनी त्याना समजून घेत पाठिंबा दिला.

आधुनिक शेतीची सुरुवात

शेती करताना शशांक समोर वेग-वेगळी ससंकट उभे राहिले  त्यापैकी महत्वाचे म्हणजे शशांकला शेती सुरू करायची होती मात्र शेती बद्दल त्याला काहीच माहीत नव्हतं. ज्यासाठी त्याला माहिती मिळविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. शशांकने देशात विविध ठिकाणी जाऊन आधुनिक शेतीची माहिती मिळवली. पण माहिती मिळवण्यात सर्वात मोठा हात शशांकच्या मामाचा होता, जो बराच काळ आधुनिक शेतीमध्ये काम करत होता, त्यापैकी बहुतेक माहिती त्याच्या मामानेच दिली होती. त्यामुळे त्यांना शेतीच्या कामात मोठी मदत झाली.

आधुनिक शेतीचे बेसिक ज्ञान प्राप्त केल्यानंतर आता कोणत्या पिकाची शेती करायची हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आणि त्यांनी शेवटी सिमला मिरचीची पाच एकरात शेती सुरू केली. पाच एकर शेतजमीन त्यांनी भाडेतत्त्वावर घेत त्यांनी शिमला मिरची लागवड केली. आजच्या घडीला या दोघा भावांना शेतीतून चांगली कमाई होत आहे. पाच एकरापासून सुरु केलेली शेती आजच्या घडीला 22 एकरांत विस्तारले असून त्यांना यातून 15 कोटींपर्यंतची कमाई होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe