Successful Farmer : एकीकडे शेतकरी बांधव शेतीमध्ये सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असल्याने शेती परवडत नाही असा ओरड करत आहेत. निश्चितच हे शाश्वत सत्य असून नैसर्गिक आपत्तीमुळे येणार कवडीमोल उत्पादन आणि बाजारात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
मात्र अशा विपरीत परिस्थितीत देखील योग्य नियोजन आखून शेतीतून लाखोंची कमाई करणारे, चांगले विक्रमी उत्पादन मिळवणारे शेतकरी देखील आपल्या नजरेस पडतात. सातारा जिल्ह्यातही असंच एक उदाहरण समोर आल आहे. जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या मौजे कार्वे येथील एका प्रयोगशील ऊस उत्पादक शेतकऱ्याने 22 गुंठ्यात 64 टन एवढ उसाचे विक्रमी उत्पादन घेऊन दाखवल आहे.
विशेष म्हणजे या अवलियाने नोकरी सांभाळत ऊस शेतीमधून विक्रमी उत्पादन घेतल आहे. हेच कारण आहे की पंचक्रोशीत सध्या या अवलियाची चांगलीचं चर्चा रंगली आहे. प्रमोद देसाई असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव असून ते आपली नोकरी सांभाळत शेती करत आहेत. प्रमोद यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी, 25 जून रोजी उसाची लागवड केली. को 86032 या वाणाचे उस बेणे लागवड करण्यात आले.
त्यांच्या एकूण उस क्षेत्रापैकी 22 गुंठे शेत जमिनीसाठी कृषी तज्ञ हेमंत राजमाने यांचे मार्गदर्शन घेतले. राजमाने यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी ऊसासाठी अन्नपूर्णा ड्रिप, सी लॅब, हाय स्पीड, फ्लोरीश, न्यूट्रीमीन डी यांच्या ४ आळवण्या दिल्या आहेत. याशिवाय प्रमोद यांनी शक्तिमान ग्रोथप्लस, सी लॅब, रेसर, फ्लोरीश, शुगर फास्ट अशी ऑरबीट क्रॉप कंपनीची उत्पादने वापरून ऊस पिकासाठी फवारणी केली.
उसाला रासायनिक खतांचा वापर कमी केला असून यामुळे खर्च कमी झाला. ऊस १२ महिन्याचे असताना व बाळ भरणीला हार्वेस्टर, स्पीड प्लस, रिच फॉसफेट व पक्की भरणीला कॅल्सी मास्टर, न्यूटीमीन (सूक्ष्म अन्नद्रव्ये) ही उत्पादने त्यांनी वापरली आहेत. अशा पद्धतीने औषध तसेच खतांचे व्यवस्थापन केल्याने उसाची वाढ चांगली झाली. फुटवे चांगले आलेत. उसाचे वजन वाढले.
परिणामी उसाचे विक्रमी उत्पादन मिळाले. निश्चितच, आपली नोकरी सांभाळत ऊस शेतीमध्ये प्रमोद यांनी केलेली ही कामगिरी इतरांसाठी प्रेरक ठरणार आहे. प्रमोद यांनी जर शेतीमध्ये के नियोजन आखले, तज्ज्ञांचा सल्ला घेतला, रासायनिक खतांचा वापर कमी केला तर निश्चितच विक्रमी उत्पादन मिळवल जाऊ शकतो हे दाखवून दिला आहे.