Successful Women Farmer: हम भी किसी सें कम नहीं…! गाईच्या शेणापासून महिलांनी तयार केलेत दागिने,  आज लाखोंची कमाई; बनल्या आत्मनिर्भर

Published on -

Successful Women Farmer: भारतीय परंपरेत, गाय अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते, येथे लोक तिची पूजा करतात आणि तिला देवाच्या समान मानतात. गाईच्या दुधापासून अनेक उत्पादने बनवली जातात जसे – दही, तूप, लोणी, चीज इत्यादी आणि आपण ते आपल्या जीवनात अनेक प्रकारे वापरतो. तसेच आपण गाईचे शेण इंधन म्हणून वापरतो.

पण आजच्या या लेखात आम्ही गाईच्या शेणाशी (Cow Dung Business) संबंधित एका विषयावर बोलणार आहोत, जो कोणालाही विचार करायला भाग पाडू शकतो, ते म्हणजे शेणापासून बनवलेले दागिने, हे अनेकांना माहित असेल. पहिल्यांदा ऐकल्यावर विश्वास बसणार नाहीच पण हे सत्य आहे.

मित्रांनो आपल्या देशात मोठ्या प्रमाणात पशुपालन (Animal Husbandry) केले जाते. पशुपालन विशेषता गाय पालन (Cow Farming) हे मुख्यतः दूध उत्पादनासाठी आपल्या देशात केले जाते. मात्र दुग्ध उत्पादनापलीकडे बिहार (Bihar) मधील एक महिला गायीच्या शेनापासून आभूषणे तयार करून इतर पशुपालकांना प्रेरणा देण्याचे काम करत आहे.

खरे तर प्रेमलता या मूळच्या बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील महिलेने गायीची उपयुक्तता ही प्रेरणा मानून लोकांना संदेश देण्याचे काम केले आहे. गाईच्या दुधापासून दुग्धजन्य पदार्थांपासून शेणापर्यंतची उपयुक्तता सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. 

प्रेमलता सुमारे 30 वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि लहान गावांमध्ये आणि शहरांमध्ये जाऊन तेथील महिलांना आणि बेरोजगारांना शेणाची उपयुक्तता सांगतात. त्या शेणाचा वापर करून दागिने बनवून दाखवतात आणि लोकांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरित करतात.

प्रेमलता यांनी शेणापासून 2000 हून अधिक उत्पादने बनवली आहेत

प्रेमलता यांनी आतापर्यंत शेणापासून 2000 हून अधिक उत्पादने तयार केली आहेत, जी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सेंद्रिय आणि आरोग्यदायी आहेत. ज्यामध्ये दागिन्यांपासून ते घरात वापरल्या जाणार्‍या वस्तू, पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, अगरबत्ती, घर सजवण्यासाठी मूर्ती, शेणाच्या विटा, चप्पल, घड्याळ, खेळणी, कानातले, गळ्यातले हार, हातातील बांगड्या, हेअर क्लिप आणि खूप काही.

प्रेमलता यांची दागिने बनवण्याची ही कला अतिशय अप्रतिम आहे, त्यांनी यातून केवळ स्वत:लाच स्वावलंबी बनवले नाही, तर बिहारच्या विविध भागात जाऊन बिहारमधील महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरित केले आहे. निश्चितच प्रेम लता यांनी केलेली कामगिरी इतर महिलांसाठी प्रेरणा देणारी आहे.

प्रेम लता यांच्या या कामगिरीमुळे पशुपालक शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळणार आहे. पशुपालक शेतकरी बांधव निश्चितच गायीच्या शेनापासून दागदागिन्यांची निर्मिती करून तसेच खेळण्यांची निर्मिती करून अतिरिक्त उत्पन्न आपल्या व्यवसायात प्राप्त करू शकणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe