मानलं संजय भावा!! मोतीच्या शेतीतुन कमवतोय 10 लाख; जाणुन घ्या गडचिरोलीच्या पट्ठ्याचा अभिनव प्रयोग

Ahmednagarlive24 office
Published:

Krushi news: मित्रांनो भारतात जवळपास प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांच्या मुलाने उच्चशिक्षण घेतल्यानंतर सरकारी नोकरीं करावी. नवयुवक देखील आपल्या आई-वडिलांच्या इच्छेसाठी आणि सरकारी नोकरीचा रुतबा बघता सरकारी नोकरीं मिळवण्यासाठी अहोरात्र काबाडकष्ट करत असतात.

महाराष्ट्रातील विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli) रहिवासी असलेले संजय गंडाटे हे देखील सरकारी नोकरीच्या शोधात अहोरात्र काबाडकष्ट करत होते. मित्रांनो खरं पाहता संजय हे शेतकरी कुटुंबातील आहेत. संजय यांनी काही वर्षे सरकारी नोकरीची तयारी केली मात्र यशाला काही गवसणी घालता आली नाही.

शेवटी यश न मिळाल्याने त्यांनी काहीतरी जरा हटके करण्याचा विचार केला अन मग काय शेतकरी कुटुंबातले असल्यामुळे आधुनिक पद्धतीने शेती (Farming) करण्याचा निर्णय घेतला अन मग शोधाशोध सुरु झाली. बरीच शोधाशोध केल्यानंतर त्यांनी मोत्यांची शेती (Pearl Farming Business) म्हणजेच पर्ल फार्मिंग करण्यास सुरूवात केली.

संजय गेल्या 7 वर्षांपासून मोत्यांची शेती करत आहेत. विशेष म्हणजे संजय यांनी उत्पादित केलेल्या मोतीला देशांतर्गत मोठी बाजारपेठ आहे एवढेच नाही तर, भारताबाहेर इटली, अमेरिका इत्यादी देशांमध्येही त्याच्या मोत्यांना मोठी मागणी आहे. यातून संजय यांना वर्षाला 10 लाख रुपयांची कमाई होतं आहे.

संजय 38 वर्षांचे आहेत. म्हणजेच वयाच्या 31 व्या वर्षापासून संजय पर्ल फार्मिंग करत आहेत. संजय सांगतात की, त्यांना अगदी लहानपणापासूनच मोत्याची आवड आहे. गावाजवळ नदी असल्यामुळे संजय अनेकदा मित्रांसोबत शिंपले काढायला जातं असतं.

असे असले तरी वयाच्या 31 व्या वर्षापर्यंत त्यांनी या मोतीच्या शेतीबद्दल कधीचं विचार केला नाही आणि विशेष म्हणजे मोती कसा तयार होतो याची कोणतीही विशिष्ट माहिती त्यांना नव्हती. संजय यांनी काही वर्षे सरकारी शिक्षक बणण्यासाठी तयारी केली, पण निवड झाली नाही, तेव्हा कंपनीत नोकरी करण्यापेक्षा शेती उत्तम आहे आणि आधुनिक पद्धतीने काळाच्या ओघात बदल करून शेती करावी, अशी योजना त्यांनी आखली.

भाड्यावर घेतला तलाव अन सुरु केली पर्ल फार्मिंग
मित्रांनो संजय यांना पारंपरिक शेती करायची नव्हती. त्यांना शेतीत काहीतरी नवीन आणि जरा हटके करायचे होते. तेव्हा त्यांना वाटले की, त्यांच्या गावातील नदीत मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या शिंपल्यापासून काही तयार करता येईल का? यानंतर त्यांनी जवळचे कृषी विज्ञान केंद्र गाठले.

तेथून संजयला कळलं की या शंखांच्या मदतीने मोती बनवता येतात. संजय सांगतो की, त्यांना शंखांची आवड होती, मग काय आवडीलाच व्यवसाय बनवून पैसे कमवण्याची त्यांनी योजना आली. या अनुषंगाने त्यांनी ठरवलं की, आता नफा-तोटा काहीही असो, ते त्यांच्या आवडीचं रूपांतर व्यवसायात करणार.

यानंतर त्यांनी नदीतून काही शिंपले आणले आणि भाड्याने तलाव घेऊन पर्ल फार्मिंग सुरूकेलीकेले. मग त्याने बहुतेक संसाधने स्वतः विकसित केली. त्यामुळे त्याला फक्त 10 हजार रुपय खर्च आला.

सुरुवातीला सहन करावा लागला तोटा
संजय पर्ल फार्मिंग व्यवसायात नवीन असल्याने. त्यांना या व्यवसायात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांना पर्ल फार्मिंग व्यवसायाची कोणतीही खास पद्धत माहित नव्हती. यामुळे त्यांना सुरुवातीला तोटा सहन करावा लागला.

त्यांचे बहुतेक ऑयस्टर किंवा शिंपले मरण पावले. मात्र जिद्दी संजयने हार मानली नाही आणि त्याने आपला विचार देखील बदलला नाही. पर्ल फार्मिंग समजून घेण्यासाठी त्याने आणखी काही वेळ खर्च केला.

इंटरनेटचा वापर केला आणि पर्ल फार्मिंग विषयी माहिती गोळा केली. एवढेच नाही थोडे संशोधन केले. मग मात्र पर्ल फार्मिंग संजयसाठी फायद्याचे ठरले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात मोती तयार केले.

यानंतर संजयने मागे वळून कधीच पाहिले नाही. हळूहळू त्यांनी आपल्या पर्ल फार्मिंग व्यवसायाची व्याप्ती वाढवली. आज त्यांच्याकडे स्वतःचा तलाव आहे. ज्यामध्ये आता पाच हजार शिंपले आहेत. यातून ते डझनभराहून अधिक डिझाईन्सच्या विविध जातींचे मोती तयार करत आहेत.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर
सोशल मीडियाच्या माध्यमातून संजय आता मार्केटिंग करत आहेत. आजही संजय या प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर करतो. तसेच संजय यांनी त्यांची स्वतःची वेबसाईट सुरु केली आहे. जिथे लोक ऑनलाइन खरेदी करू शकतात. अनेक लोक फोनवरूनही ऑर्डर देतात. त्यानंतर संजय त्यांना कुरिअरद्वारे मोती पाठवतो. संजय मोती 1200 रुपये प्रति कॅरेट दराने विकत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe