Ahmednagar News : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी योजना असून, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यांत विभागून देण्यात येतात, परंतु प्रारंभी शासनाकडून या योजनेस पात्र नसलेल्या शेतकऱ्यांना पैसे दिले गेले. आता ते पैसे वसूल करण्याची मोहीम जिल्हास्तरावर सुरू आहे.
राज्यात सर्वाधिक ५ लाख १७ हजार लाभार्थी नगर जिल्ह्यात आहेत. त्यापैकी हजारो शेतकऱ्यांकडून वसुली करणे बाकी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत सहा हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना देण्यात येतात. परंतु मागील काही दिवसांपूर्वी अनेक अपात्र लाभार्थ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आलेले होते.
यावर खरदारी म्हणून आता सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये अनेक बदल असून ज्यांनी अपात्र असतानाही याचा लाभ घेतला त्यांची रक्कम शासन परत घेत आहे.
लाभ घेण्यासाठी काय आवश्यक?
तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता नोंदणी करा परंतु ही नोंदणी करताना विविध गोष्टींची काळजी घेणे आवश्यक झालेले आहे. हे करताना काही चुका झाल्या तर त्यामुळे या योजनेच्या लाभापासून तुम्ही वंचित राहाल.
नवीन नोंदणी करताना लक्षात ठेवा..
तुम्हाला जर नवीन नोंदणी करावयाची असेल तर पीएम किसानच्या संकेतस्थळावर नवीन नोंदणी करता येते. नवीन नोंदणी करताना बँकेचे खाते क्रमांक, नाव, पत्ता, फोन क्रमांक ही माहिती मात्र अचूक असावी. बँक खाते आधारशी लिंक असावे व आधार कार्डमध्ये जे नाव लिहिले आहे तेच नाव बँक खात्यात असणे आवश्यक आहे. नोंदणी करताना रेशन कार्ड देखील सोबत ठेवा कारण ते देखील आवश्यक आहे.
प्रशासनाकडून आकडेवारी जुळवण्याचे काम
सध्या अहमदनगर जिल्ह्यात अपात्र आणि करदात्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान सन्मान योजनेची गेलेली रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वसूल केली जात आहे. कृषी विभागाकडे केवायसी करण्याची जबाबदारी दिलेली असून याबाबत अद्ययावत आकडेवारी प्राप्त झाली नाही. एकंदरीत दोन्ही यंत्रणांकडून आकडेवारी जुळवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.