Krushi News Marathi: मान्सूनचे (Monsoon) दोन दिवसांपूर्वी राज्यात दणक्यात आगमन झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमवेतचं (Farmer) उकाड्याने हैराण झालेल्या जनतेस मोठा आराम मिळाला आहे.
शेतकरी बांधव सध्या खरिपातील (Kharif Season) पेरणीसाठी लगबग करत असल्याचे चित्र संपूर्ण राज्यात बघायला मिळत आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातून (Solapur News) जिल्हा प्रशासनाचा एक कौतुकास्पद निर्णय समोर येत आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, कृषी विभागाकडे (Agricultural Department) प्राप्त झालेले सोयाबीन व तुरीचे बियाणे जिल्ह्यातील कोरोना काळात मयत झालेल्या शेतकरी कुटुंबाच्या वारसदाराला प्राधान्याने उपलब्ध करून दिले जाणार आहे.
याबाबतचे आदेश जिल्हा अधीक्षक (District Superintendent) यांनी दिले असून त्या संबंधित परिपत्रके देखील जिल्हा अधीक्षकांनी काढले असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच सोलापूर जिल्हा कृषी विभागाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, सोयाबीन व तुरीचे हे बियाणे (Soybean Seed) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील कोरोना काळात मयत झालेल्या शेतकरी कुटुंबांच्या वारसदाराला दिले जाणार आहेत.
हे बियाणे संबंधित कुटुंबांच्या वारसदाराला मोफत दिली जाणार असून या शेतकरी कुटुंबाला विशेष प्राधान्याने हे बियाणे वाटप केले जाणार आहे.
खरं पाहता पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधव रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. म्हणून या जिल्ह्याला रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखले जाते.
मात्र अलीकडच्या काळात सोलापूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र देखील मोठे वाढत आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन व तुरीचे बियाणे किट मोफत दिले जाणार आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सोलापूर जिल्ह्यात 3200 सोयाबीन बियाणे बॅग शेतकऱ्यांना वाटप केल्या जाणार आहेत. तुरीच्या 2320 बियाण्याच्या बॅग वाटप केल्या जाणार आहेत.
ज्या शेतकरी कुटुंबातील पती किंवा पत्नी मयत झाल्या आहेत त्या शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना हे बियाणे मोफत दिले जाणार आहे. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी आदेश काढले असल्याचे सांगितले जात आहे.
सोयाबीनची बॅग ही 8 किलो वजनाची आहे तर तुरीची बॅग चार किलोची आहे. जे. एस. 2034 व जे. एस. 2098 या जातीचे सोयाबीनचे बियाणे वाटप केले जाणार आहे.