मराठवाड्यात रेशीम शेतीत होतेय वाढ, कृषी विज्ञान केंद्राकडूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात बाजारपेठ व रेशीम साठवणूकीचे यंत्र उभारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे रेशीमच्या कोशांसाठी जवळच बाजार पेठ उपलब्ध झाल्यामुळे मराठवाड्यात रेशीम शेती क्षेत्रात वाढ होत आहे.

जालना जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या रेशीम कोशाच्या बाजारपेठे मुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान न होता आता रेशीम विक्रीसाठी कर्नाटक ला जाण्याची गरज मिटली असून स्थानिक पातळीवरच बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक हातभार देण्यात रेशीम शेतीचा मोठा वाटा आहे. तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे महत्त्व पटवून देऊन क्षेत्र वाढ होण्यामागे महासंचालनालयन,खरपुडी कृषी विज्ञान केंद्राची मोठी भूमीका आहे.

शेतीला पर्याय म्हणून रेशीम शेती मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. रेशीम शेतीत योग्य नियोजन केल्यास त्याचे उत्पादन वाढ होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नफ्यातही वाढ होणार आहे.

त्यासाठी शेतकऱ्यांनी जून ते जुलै या दरम्यान रेशीमची लागवड केल्यास डिसेंबरमध्ये याला पहिले पीक येते. तर दुसऱ्या वर्षी मे ते जून दरम्यान तुतीची तळ छाटणी करुन घेतात.

असे वर्षीत चार पिके मिळून एकरी 500 किलो कोष उत्पादन शेतकरी घेऊ शकतात. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून रेशीम शेतीकडे आपला कल वाढवण्या मागे कृषी विज्ञान केंद्राचे मोठे योगदान आहे.

खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सातत्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. दर महिन्याच्या 5 तारखेला हा अभिनव उपक्रम घेतला जातो. त्यात थेट शेतकऱ्यांशी संवाद करून शेतकऱ्यांना रेशीम शेती विषयक निर्माण होणाऱ्या अडचणी जाणून घेवून त्याचे निरसणही करण्यात येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe