उच्चशिक्षित असलेल्या ‘या’ दोन मित्रांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केला स्टार्टअप! वाढवले शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि स्वतःही झाले कोट्यावधी रुपयांचे मालक

अमनदीप पनवार आणि ऋषभ चौधरी या दोन मित्रांनी उचलले व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून या दोन मित्रांनी भारतरोहण नावाचा स्टार्टअप सुरू केला आहे व या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारची मदत हे दोघे मित्र करत आहेत.

Ajay Patil
Published:

BharatRohan Agritech Startup:- भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारित असून भारत हा कृषीप्रधान देश आहे. जवळपास देशाची 70 टक्के लोकसंख्या आज शेती आणि शेतीशी संबंधित असलेल्या उद्योगधंद्यावर अवलंबून असल्याने कृषी क्षेत्राचा विकास म्हणजेच देशाचा विकास हे साधारणपणे समीकरण आहे.

परंतु जर आपल्या देशातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बघितली तर ती अत्यंत दयनीय आहे. यामागे नैसर्गिक आपत्ती हे प्रमुख कारण आहेच. परंतु सरकारची कृषी क्षेत्रासंबंधी असलेली अनेक धोरणे देखील शेतकऱ्यांना खूपच मारक असल्याचे आपल्याला दिसून येते.

या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलणे खूप गरजेचे आहे. अशाच प्रकारची पावले अमनदीप पनवार आणि ऋषभ चौधरी या दोन मित्रांनी उचलले व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून या दोन मित्रांनी भारतरोहण नावाचा स्टार्टअप सुरू केला आहे व या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारची मदत हे दोघे मित्र करत आहेत.

हे दोघेजण कॉलेजच्या काळापासूनचे मित्र असून दोघेही वैमानिक अभियंते आहेत. दोघांनाही त्यांच्या कॉलेजच्या दिवसांपासून ड्रोन बनवण्याची आवड होती. देशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर केला.

त्यांचे भारत रोहन हे स्टार्टअप शेतकऱ्यांना ड्रोन वापरून पिकांचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करायला मदत करते. देशातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी आणि त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांची ही कंपनी काम करत असून त्यांच्या या कंपनीचे मूल्य हे शंभर कोटी रुपयापर्यंत झाले आहे.

भारतरोहण नेमके काय आहे?
भारत रोहन हा एक ॲग्रोटेक स्टार्टअप असून ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम आणि अधिक कार्यक्षम शेती करायला मदत करतो. या दोन्ही मित्रांचा हा स्टार्टअप कृषी क्षेत्रामध्ये अमुलाग्र क्रांती घडवून आणत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.

या दोन्ही मित्रांचा हा प्रकल्प 6000 शेतकऱ्यांनी वीस हजार एकर जमिनीवर उभारला आहे. भारत रोहन या कंपनीने कृषी ड्रोन विकसित केला असून ज्याच्या मदतीने एक तासांमध्ये 250 एकर शेताचा संपूर्ण अहवाल आपल्याला मिळू शकतो.

या कंपनीने तयार केलेल्या ड्रोन पिकांचे आरोग्य कसे आहे यावर लक्ष ठेवतो व त्यासोबत खते आणि कीटकनाशकांची फवारणी देखील करू शकतो आणि इतर अनेक शेतीची कामे आटोमॅटिक करतो.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि शेती अधिक उत्पादनक्षम करणे हा भारत रोहन स्टार्टअपचा प्रमुख उद्देश आहे. हा ड्रोन शेतकऱ्यांना पिकांविषयी रियल टाईम माहिती देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांबाबत चांगले निर्णय वेळेत घेता येतात.
भारतरोहण कंपनी नेमके काय काम करते?

1- भारत रोहन कंपनी ड्रोनच्या साह्याने पिकांचे आरोग्य तसेच पोषक तत्वांची कमतरता, पिकांवर होणारा कीटकांचा प्रादुर्भाव आणि इतर समस्या शोधण्यासाठी ड्रोनचा वापर करते.

2- ड्रोनच्या साह्याने पिकांना खते आणि कीटकनाशके अचूक आणि कमी प्रमाणात शेतात फवारली जातात व त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो आणि पर्यावरण देखील सुरक्षित राहते.

पिकांवर होणारा कीटकांचा प्रादुर्भाव अगदी सुरुवातीच्या टप्प्यात ओळखता आल्यामुळे पटकन उपाय केल्याने कीटकांमुळे पिकांचे होणारे नुकसान 30 टक्के किंवा त्यापेक्षा कमी करता येते.

3- तसेच या ड्रोनच्या साह्याने जो काही पिकांच्या बाबत डेटा मिळतो त्यावरून पीक उत्पादनाचा अंदाज लावला जातो व त्यावरून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची आगाऊ माहिती मिळते.

4- तसेच या दोन्ही मित्रांची भारतरोहण ही कंपनी शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन, सिंचन आणि इतर कृषी कार्यासाठी महत्त्वपूर्ण सल्ला देखील पुरवते. तसेच हे ड्रोन शेतकऱ्यांना पीक पाण्याच्या तानाची पातळी आणि पिकांना होणाऱ्या पोषक तत्वांच्या कमतरतेबद्दल तपशीलवार माहिती देऊन सिंचन आणि खतांचा वापर यासारख्या स्वतःच्या कामांमध्ये सुधारणा करायला सक्षम करते.

5- भारत रोहनचे जर फायदे बघितले तर या स्टार्टअप मुळे ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर यामुळे पीक उत्पादनात वाढ होते आणि खते तसेच कीटकनाशकांचा कमीत कमी वापर केल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन नफा जास्त राहतो. पिक उत्पादनात वाढ आणि खर्च कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढते.

ऋषभ चौधरी आणि अमनदीप पनवार यांनी 2016 मध्ये सुरू केली कंपनी
भारत रोहन ही कंपनी सध्या देशातील पाच राज्यांमधील जवळपास 50000 शेतकऱ्यांना प्रगत ड्रोन निर्णय समर्थन प्रणाली सह मदत करत आहे. यालाच भारत रोहन क्रॉप ॲशुअर म्हणून देखील ओळखले जाते. यांच्या कंपनीने गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत नफ्यात तीन पट आणि 200% वाढ करून आशादायक चित्र निर्माण केले आहे.

भारत रोहन या ॲग्रोटेक स्टार्टअपने 2.3 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 19 कोटी रुपयांचा निधी जमा केला होता व हा निधी फ्री आयपीओ फंडिंग अंतर्गत उभारण्यात आला आहे. सध्या या कंपनीत एकूण 14 गुंतवणूकदार आहेत.

तुमच्या भागात भारतरोहणचे फायदे मिळवायचे असतील तर काय करावे लागेल?
तुम्हालाही भारतरोहणचे फायदे मिळवायचे असतील तर त्याकरिता तुम्हाला या कंपनीची अधिकृत वेबसाईट bharatrohan.in वर संपर्क साधून चौकशी करता येते किंवा तुमच्याजवळ कुठलीही शेतकरी उत्पादक कंपनी किंवा एनजीओ असेल तर त्या माध्यमातून तुम्ही या कंपनीशी संपर्क साधू शकता.

परंतु या कंपनीच्या माध्यमातून मिळणारे फायदे घ्यायचे असतील तर गावात दीडशे ते दोनशे एकर जमीन असावी हा एक कंपनीचा निकष आहे व एका जिल्ह्यात जवळपास पाच ते सहा गावे असावीत ज्यामध्ये कंपनी आरामात त्यांची सेवा सुरू करू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe