‘या’ शेतकऱ्याने 100 कोंबड्यांपासून सुरू केला पोल्ट्री उद्योग आणि आज आहे 50 हजार कोंबड्यांचे अत्याधुनिक पोल्ट्री फार्म! वार्षिक टर्नओव्हर आहे 15 कोटी

Ajay Patil
Published:

तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची सुरुवात करायची असेल तर सुरुवात ही लहान स्वरूपामध्ये करणे एक आर्थिक दृष्ट्या कधीही फायद्याचे ठरते व टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टींची काळजी घेत योग्य नियोजन करून त्यात वाढ करणे महत्त्वाचे ठरते. व्यवसायाचे देखील तसेच असते. कुठलाही व्यवसाय सुरू करताना त्यामध्ये लाखो रुपये टाकून तो मोठ्या प्रमाणात सुरू करण्याला काही अर्थ नसून छोट्या स्वरूपात त्याची सुरुवात करून सातत्याने अभ्यास करून त्यात बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे वाढ करत जाणे गरजेचे असते.

कारण आपल्याला माहित आहे की, एक वटवृक्ष किंवा मोठे झाड तयार होण्यासाठी  त्याचे छोटेसे रोपच लावावे लागते व हाच मुद्दा व्यवसायाच्या बाबतीत देखील लागू होतो.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण अमरावती जिल्ह्यातील रवींद्र मेटकर या शेतकरी राजाची यशोगाथा पाहिली तर ती या मुद्द्याला साजेशी आहे. आज पोल्ट्री उद्योगातले हे मास्टर असून त्यांचा पोल्ट्री मधील वार्षिक टर्नओव्हर 15 कोटीच्या पुढे गेला आहे. परंतु व्यवसायातील सातत्य आणि कष्ट या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे.

 शंभर कोंबड्या घेऊन केली पोल्ट्री व्यवसायला सुरुवात

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमरावती जिल्ह्यातील रवींद्र मेटकर हा शेतकरी सरकारी कर्मचारी असून या नोकरीसोबतच आणखी आर्थिक सहाय्य किंवा आर्थिक भार कुटुंबाला लागावा याकरिता पोल्ट्री उद्योग सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. परंतु सुरुवात करताना अगदी मोठ्या प्रमाणात सुरुवात न करता त्यांनी अगदी वडिलांकडून तीस हजार रुपये घेतले व त्यातून शंभर कोंबड्या विकत आणून पोल्ट्री उद्योगाचा श्री गणेशा केला.

त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करत अथक प्रयत्नाने आज याच पोल्ट्री उद्योगातून रवींद्र मेटकर हे कोट्यावधी रुपयांची कमाई वार्षिक उलाढाल करत आहेत. शंभर कोंबड्यांपासून सुरू झालेला त्यांचा हा पोल्ट्री उद्योग आज पन्नास हजार कोंबड्यांच्या क्षमता असलेल्या अत्याधुनिक आणि ऑटोमॅटिक पोल्ट्री फार्मपर्यंत पोहोचलेला आहे.

त्यांनी या ऑटोमॅटिक पोल्ट्री फार्म उभारण्याकरिता 18 लाखाचा खर्च केला असून याशिवाय त्यांच्याकडे एक लाखापेक्षा जास्त कोंबड्या बसतील एवढ्या क्षमतेचा पोल्ट्री फार्म देखील उभारला जात आहे.

या माध्यमातून ते अंड्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतात व महाराष्ट्र व आजूबाजूच्या राज्यांमध्ये अंड्यांचा पुरवठा करतात. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने पोल्ट्री उद्योगांमध्ये मिळवलेले अनन्यसाधारण यश पाहून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना केंद्र सरकारकडून देखील आमंत्रित केले जाते.

 वर्षाला आहे 15 कोटींची उलाढाल

त्यांच्याकडे खूप कमी प्रमाणामध्ये जमीन होती व दुसरी जमीन घ्यायची म्हटले त्यांच्याकडे पैसा न होता. परंतु नशिबाने त्यांच्या आईला माहेरी जमीन मिळाली होती व ही जमीन त्यांनी विकून गावामध्ये जमीन घेतली. अशा प्रकारे पोल्ट्री शेडसाठी त्यांना जागेचा प्रश्न होता तो मिटला व पोल्ट्री उद्योगाकरिता त्यांनी बँकेकडून आर्थिक सहाय्य देखील घेतले.

कष्ट आणि परिश्रमाने त्यांचे  शंभर कोंबड्यांपासून सुरू झालेला पोल्ट्री उद्योग आज लाखोंच्या कोंबड्यांपर्यंत पोहोचलेला आहे. त्यांच्याकडे आज ५० मजूर कामाला आहेत आणि एवढ्या 50 लोकांना रोजगार देखील त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. दररोज त्यांना या पोल्ट्री उद्योगाकरिता चार हजार रुपयांचा खर्च येतो व वार्षिक टर्नओव्हर तब्बल 15 कोटींपेक्षा जास्त आहे.

या पद्धतीने रवींद्र मेटकर यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की सुरुवात अगदी छोटीशी जरी राहिली तरी आपण अथक प्रयत्न आणि अभ्यास वृत्तीने टप्प्याटप्प्याने कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय नेऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe