अण्णासाहेबांची द्राक्ष शेती आहे ऑटोमॅटिक! मोबाईल आणि संगणक करतो 30 एकर क्षेत्रावरील द्राक्षबागेचे मॅनेजमेंट,वाचा माहिती

Ajay Patil
Published:

शेतीमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे अनेक प्रकारची कामे ही तंत्रज्ञानाच्या आणि यंत्रांच्या मदतीने कमीत कमी वेळेत आणि खूप कमी खर्चामध्ये करता येणे शक्य झाले आहे. अगदी 20 ते 30 एकर क्षेत्र असेल तरी मोजक्याच मजुरांच्या साह्याने आणि यंत्रांचा वापर करून  कमीत कमी वेळामध्ये शेतीतील कामांच्या मॅनेजमेंट शेतकरी करतात.

वेळ तर वाचतोस परंतु तंत्रज्ञानाच्या वापराने कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील खूप जास्त प्रमाणामध्ये आर्थिक उत्पन्न मिळवता येणे शक्य झाले आहे. याच पद्धतीने जर आपण तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी केली जाते याचे जर उदाहरण घेतले तर नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव येथील अण्णासाहेब माळी या प्रयोगशील आणि प्रगतीशील शेतकऱ्याच्या शेतीचे उदाहरण घेऊ शकतो.

 अण्णासाहेबांची शेती आहे संपूर्णपणे हायटेक

नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर द्राक्ष लागवडीकरिता संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेला जिल्हा असून याच जिल्ह्यातील वडनेर भैरव येथील प्रगतिशील शेतकरी अण्णासाहेब माळी यांचे संपूर्ण द्राक्ष शेती ऑटोमेशनच्या माध्यमातून हँडल करतात. अगोदर शेतीला पाट पद्धतीने पाणी देणारे अण्णा साहेबांनी कष्ट करून 30 एकर जमिनीवर द्राक्ष बागेची लागवड केली व सिंचनक्षत्रातील प्रसिद्ध अशा जैन इरिगेशन कंपनीचे ऑटोमेशन सिंचनाचे सुविधा बसवली.

सिंचन क्षेत्रामध्ये जशा जशा यंत्रणा विकसित होत गेल्या त्या संपूर्ण यंत्रणा शेतामध्ये ते वापरू लागले. वडिलांकडून मिळालेल्या आठ एकर जमिनीमध्ये त्यांनी प्रचंड प्रमाणात कष्ट केले व आज त्यांच्याकडे 32 एकर पर्यंत जमीन असून यामध्ये 30 एकर क्षेत्रावर द्राक्षाच्या सोनाका, सिडलेस शरद, थॉमसन तसेच माणिक चमन या द्राक्षांच्या जाती 9 बाय 5 अंतरावर लावले असून  या बागेवर स्प्रे तसेच डीपिंग सारखी कामे ते मिनी ट्रॅक्टरच्या मदतीने करतात.

तीस एकर द्राक्ष लागवड केली असून 11 प्लॉटमध्ये त्याची विभागणी केलेली आहे. तीस एकर मधील बागेत रस्त्यांची सोय असून राहण्यासाठी जागा तसेच मजुरांसाठी घरे व गुरांसाठी गोठे याकरिता दोन एकर जमीन त्यांनी राखीव ठेवलेली आहे. कमीत कमी शिक्षण घेतलेला माणूस देखील तंत्रज्ञानाचा वापर किती उत्तम पद्धतीने करू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अण्णासाहेब माळी आहेत. तीस एकर वरील संपूर्ण द्राक्ष बागेचे पाण्याचे नियोजन ते अगदी घरबसल्या लॅपटॉपच्या साह्याने करतात.

कोणत्या प्लॉटला फर्टिगेशन व कोणत्या प्लॉटमध्ये विद्राव्य खते द्यायचे आहेत याबाबत ते स्वतः फेरफटका मारतात व नियोजन करतात. बागेत निरीक्षण केल्यानंतर बागेतूनच आपल्या मोबाईलच्या साह्याने त्यांची इंजिनिअरिंग मध्ये पदवी घेतलेल्या सुनबाईंना सूचना देतात व सुनबाई घरातील काम करता करता लॅपटॉप वर कमांड देतात व लगेच शेतीतील काम सुरू होते इतके सोप्या पद्धतीची ऑटोमेशन सिस्टम ही जैन इरिगेशनच्या माध्यमातून त्यांनी इन्स्टॉल केलेली आहे. संपूर्ण देशाच्या कुठल्याही भागात जरी असाल तरी त्या ठिकाणाहून तुम्हीही संपूर्ण सिस्टम कंट्रोल करू शकता. राजश्री माळी या त्यांच्या लहान सुनबाई असून ते संपूर्ण या ऑटोमेशनची हाताळणी करतात.

 अण्णासाहेब द्राक्ष बागेचे नियोजन कसे करतात?

29 एकर क्षेत्रामध्ये असलेल्या द्राक्ष बागेचे नियोजन करताना ते खतांचा वापर खूप व्यवस्थित पद्धतीने करतात. खत नियोजनामध्ये प्रामुख्याने लिक्विड व सेंद्रिय खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामध्ये 0:52:34 प्रति एकर दोन बॅगा,0:0:50 दोन बॅगा तसेच 0:52:34 एक बॅग व एक ट्रक भरून शेणखत बागेसाठी वापरतात. एवढेच नाही तर ऑक्टोबर पासून ते नोव्हेंबरच्या अखेर पर्यंत छाटणी करतात व छाटणी संपवतात.

हवामानाचा व पिकाची स्थिती याचा व्यवस्थित अंदाज बांधून खतांची मात्रा ठरवतात. तसेच द्राक्ष बागेवर रोगराईचा प्रदुर्भाव  होऊ नये या करता ते पीएच काय आहे तसेच भुरीचा प्रादुर्भाव झाल्यास त्यानुसार फवारणी कोणती करावी याबद्दलचे काटेकोर नियोजन करतात. अण्णा साहेबांनी खूप मोठे कष्ट घेतले व प्रामाणिकपणे शेतीत काम केले व आजूबाजूची शेती विकत घेतली व  स्वतःच्या शेती क्षेत्राचा विस्तार केला. आज त्यांना कष्टाचे फळ मिळाले असून 14 वर्षांपूर्वी त्यांनी 23 लाख रुपये खर्च करून शेतामध्येच उत्तुंग असा बंगला बांधलेला आहे.

 यावरून आपल्याला दिसून येते की जर शेतीमध्ये कष्ट घेतले व तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेती खूप काही देऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe