Fertilizer Tips: खरी आणि बनावट खते कशी ओळखायची? खत खरेदी करताना वापरा या टिप्स आणि टाळा नुकसान

Ajay Patil
Published:
fertilizer tips

Fertilizer Tips:- शेतकरी पिकांपासून भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करतात. कारण रासायनिक खतांचा वापर हा भरघोस उत्पादनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. कारण पिकांच्या वाढीस मदत करण्यासाठी रासायनिक खते खूप महत्त्वाचे असतात.

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर केला जातो. परंतु जर आपण रासायनिक खतांच्या बाबतीत पाहिले तर बऱ्याचदा बनावट खताची विक्री देखील केली जात असल्याचे आपल्याला दिसून येते.

त्यामुळे शेतकरी बंधूंना खते खरी आहे की बनावट आहेत हे ओळखता येणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून बनावट खतांमुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांना टाळता येईल आणि पैसे देखील वाचतील.

यामध्ये बाजारात बनावट किंवा अस्सल खते ओळखण्याच्या सोप्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही फसवणूक टाळू शकतात. तसे हे एवढे सोपे काम नाही. परंतु काही सोपे मार्ग अवलंबून तुम्ही खऱ्या आणि बनावट खतामधील फरक ओळखू शकतात. याबद्दलचीच माहिती या लेखात घेऊ.

 खत खरेदी करण्याअगोदर या गोष्टी पहा

1- योग्य लेबल आणि पॅकेजिंग तपासणे- आपल्याला माहित आहे की खते हे योग्य लेबल असलेल्या पॅकेजिंग मध्ये येतात. यामध्ये तुम्हाला त्या ब्रँडचे नाव, निर्मात्याचा पत्ता, त्या खतांमध्ये असलेले घटक तसेच बॅच क्रमांक

आणि त्याची एक्सपायरी डेट यासारख्या महत्त्वाच्या माहितीचा समावेश केलेला असतो. परंतु बनावट खतामध्ये या गोष्टी तुम्हाला दिसून येत नाहीत. त्यामुळे खत दुकानातून खत खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी तपासून पाहणे गरजेचे आहे.

2- निर्माता कोण आहे हे तपासणे प्रतिष्ठित व प्रसिद्ध उत्पादक किंवा अधिकृत विक्रेत्याकडूनच खतांची खरेदी करावी. यासाठी शक्य असेल तर संबंधित उत्पादकाची वेबसाईट तपासावी किंवा उत्पादनाची माहिती घेण्यासाठी थेट संपर्क साधावा किंवा अधिकृत विक्रेत्यांची  यादी मिळवावी.

3- खताचा पोत किंवा रंग तपासणे खत घेताना खताच्या काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामध्ये तुम्ही पाहिले तर जर खत चांगले असेल तर त्याचा पोत हा एक समान असतो व रंग आणि आकार देखील व्यवस्थित असतो. परंतु या तुलनेमध्ये जर तुम्ही घेत असलेल्या खताचा पोत असामान्य, रंग वेगळा किंवा जास्त धूळ दिसत असेल तर ते बनावट आहे असे समजावे.

4- खताचा वास तपासावा जे खत असल असते त्याला वेगळा वास येत असतो परंतु तो तीव्र स्वरूपाचा नसतो. या व्यतिरिक्त तुम्ही घेत असलेल्या खताला जर असामान्य तीव्र आणि विशिष्ट वास येत असेल तर ते बनावट खत आहे याचे लक्षण असू शकते.

5- पाण्यातील विद्राव्यता तपासावी याकरिता थोडे खत पाण्यामध्ये विरघळावे. खत जर अस्सल असेल तर ते कमीत कमी अवशेष  सोडून सहजपणे विरघळली जातात. परंतु त्या तुलनेत मात्र बनावट खते हळूहळू विरघळू शकतात. तसेच विरघळताना जास्त प्रमाणामध्ये त्यांचे अवशेष पाण्यात दिसू शकतात.

6- पोषक घटकांची चाचणी- खतामधील पोषक घटकांची चाचणी केल्याने तुम्ही बनावट उत्पादने ओळख होऊ शकतात. परंतु यासाठी तुम्हाला प्रयोगशाळेचे विश्लेषण किंवा पोर्टेबल पोषक चाचणी किट वापरून खतातील पोषक घटकांची तपासणी करता येऊ शकते.

अशी चाचणी केल्यानंतर त्या खताच्या लेबल वर जे काही पोषक घटक दिलेले आहेत त्याच्याशी तुलना करून तुम्ही बनावट खत आहे की अस्सल आहे हे ओळखू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe