महाराष्ट्रातील ‘या’ गावाला म्हटले जाते शेडनेटचे गाव! येथील शेतकऱ्यांनी साधली शेडनेट आणि पॉलिहाऊच्या माध्यमातून आर्थिक प्रगती

तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी अतिशय कमी खर्चामध्ये आणि कमी क्षेत्रामध्ये देखील भरघोस असे उत्पादन मिळवू लागले आहेत. तसेच आता उदरनिर्वाह पुरती शेती ही जी काही संकल्पना होती ती मागे पडून शेतकरी उच्च दर्जाचे निर्यातक्षम उत्पादन घेऊन शेतीमालाच्या निर्यातीत देखील मागे नाहीत.

Shade Net Technology In Farming Sector:- शेतीबद्दल जी काही तरुणाईमध्ये अनास्था होती किंवा शेती बद्दल जो काही एक मतप्रवाह होता तो आता बदलायला लागला असून शेती ही आता खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्टिकोनातून केली जात असून एका इंडस्ट्री प्रमाणे शेतीमध्ये देखील आता व्यवस्थापन आणि अचूक नियोजनाला महत्त्व दिले जात आहे.

यामागे असलेल्या कारणांचा जर आपण शोध घेतला तर प्रमुख कारण म्हणजे कृषी क्षेत्राशी संबंधित विकसित करण्यात आलेले अत्याधुनिक असे तंत्रज्ञान आणि त्या तंत्रज्ञानाचा अतिशय कौशल्य पूर्ण रीतीने शेतकऱ्यांनी शेतीमध्ये केलेला वापर या दोन गोष्टी कारणीभूत आहेत.

तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी अतिशय कमी खर्चामध्ये आणि कमी क्षेत्रामध्ये देखील भरघोस असे उत्पादन मिळवू लागले आहेत. तसेच आता उदरनिर्वाह पुरती शेती ही जी काही संकल्पना होती ती मागे पडून शेतकरी उच्च दर्जाचे निर्यातक्षम उत्पादन घेऊन शेतीमालाच्या निर्यातीत देखील मागे नाहीत.

शेती तंत्रज्ञानाचा दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये पॉलिहाऊस किंवा शेडनेट सारखे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे असून या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना कमी क्षेत्रामध्ये कमी कालावधीत भरघोस उत्पादन मिळवणे शक्य झाले आहे व अनेक भाजीपाला पिकांची लागवड करून या तंत्रज्ञानाच्या मदतीने लाखोत नफा शेतकरी मिळवत आहेत.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी या गावचा विचार केला तर या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस आणि शेडनेट या तंत्रज्ञानाची कास धरत गावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विशेष म्हणजे या गावाला आता महाराष्ट्रामध्ये शेडनेटचे गाव म्हणून देखील ओळखले जात आहे. या ठिकाणी सध्या शेडनेटच्या साह्याने शेतकरी ढोबळी मिरची तसेच परदेशी भाजीपाला लागवड व काकडी लागवडीतून लाखो रुपये कमी कालावधीत कमवत आहेत.

कडबनवाडीतील शेतकऱ्यांनी धरली आधुनिक तंत्रज्ञानाची कास
याबाबत सविस्तर वृत्त असे की,इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरली. यामध्ये त्यांनी शेडनेट व पॉलिहाऊस तंत्रज्ञानाचा वापर करून ढोबळी मिरची तसेच काकडी व परदेशी भाजीपाला लागवड करून कमी कालावधीत लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे.

सध्या या गावच्या शेतकऱ्यांची वाटचाल ही पॉलिहाऊस व शेडनेट शेतीकडे सुरू असल्याचे दिसून येते. या गावामध्ये ढोबळी मिरची तसेच परदेशी भाजीपाला लागवड व काकडी लागवड सारख्या कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या लागवडीचे तंत्र शेडनेट शेतीच्या माध्यमातून राबवले जात आहे.

सध्या या गावामध्ये दोन पॉलिहाऊस आणि 65 शेडनेट असून अजून काही पॉलिहाऊसेस आणि शेडनेटचे काम प्रस्तावित आहे. संपूर्ण कडबनवाडीचा विचार केला तर या ठिकाणी असलेल्या एकूण शेतीपैकी 100 एकर पेक्षा जास्त शेती शेडनेट खाली आणली गेली आहे.

शेडनेट सारख्या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना तर झालाच. परंतु हजारो हातांना काम देखील मिळाले आहे. या परिसराचा सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय हा शेती असल्यामुळे नक्कीच हे तंत्रज्ञान फायद्याचे ठरत आहे. जर या गावच्या परिसरातील जर पाण्याची उपलब्धता बघितली तर गावच्या एकूण असलेल्या 1000 हेक्टर शेतीपैकी केवळ 40% शेती बागायती होती.

परंतु गावाची संपूर्ण उपजीविका शेतीवरच अवलंबून असल्याने शेतीत बदल होणे गरजेचे होते. परंतु आता शेडनेट व पॉलिहाऊस तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीचे रूप जसे बदलायला लागले तसा आता गावाच्या आर्थिक प्रगतीत देखील बदल दिसून येत आहे. या ठिकाणी विहिरींनी अगोदर पाण्याच्या बाबतीत तळ गाठलेला होता.

परंतु या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या अनेक कामे केली व त्याचा नक्कीच फायदा झाला. जलसंधारणाच्या कामांमध्ये बंधाऱ्यांचे बांधकाम तसेच नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण, तलावांचे पुनरुज्जीवन यासारखी कामे हाती घेतली व त्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढली व भूजल पातळीत देखील वाढ झाली व त्याचा नक्कीच फायदा शेतीच्या सिंचनासाठी होऊ लागला.

शेतीला अशा पद्धतीने पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला व शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून तंत्रज्ञानाची कास धरली. आजच्या आधुनिकीकरणाच्या युगामध्ये शेतात असलेल्या आवश्यक गरजा लक्षात घेऊन शेडनेट शेतीकडे वाटचाल इथल्या शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.

आज कडबणवाडीच्या शिवारामध्ये ढोबळी मिरची आणि काकडीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाखोत आर्थिक नफा मिळताना दिसून येत आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे शेडनेट उभारणीसाठी राज्याच्या कृषी विभागाकडून देखील चांगली मदत झाली असून शेडनेट उभारणीसाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या 50 टक्क्यांपर्यंत अनुदान कृषी विभागाकडून देण्यात आले आहे.

इतकेच नाहीतर शेततळी व ठिबक सिंचनाचा आधार देखील महत्त्वाचा ठरला. या ठिकाणी असलेल्या पाणीटंचाईवर मात करता यावी म्हणून या गावात ७० शेततळे आहेत व पाणी टंचाईच्या कालावधीमध्ये या शेततळ्यांचा येथील शेतीला खूप मोठा फायदा होताना दिसून येत आहे.

तसेच लागवडीखालील जे काही क्षेत्र या गावात आहे त्या संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचन करण्यात आले असून त्या माध्यमातून उपलब्ध पाण्यात चांगले उत्पादन घेणे शक्य झाले आहे. तसेच गावातील महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून एका शेडनेटमध्ये 20 ते 25 मजुरांना काम मिळत असल्याने गावातील हजारो हातांना आज रोजगार उपलब्ध झाला आहे.

शेडनेटच्या माध्यमातून येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर मिरची तसेच टोमॅटो व काकडी इत्यादी भाजीपाला पिकांचे उत्पादन घेत असून त्यामुळे आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल इथल्या शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe