Tractor News : दिवाळीच्या सणाला ट्रॅक्टर घ्यायचा का? मग स्वराज कंपनीचा ‘हा’ ट्रॅक्टर तुमच्यासाठी ठरणार किफायतशीर

Ajay Patil
Published:
tractor news

Tractor News : अलीकडे शेतीमध्ये (Farming) यंत्रांचा वापर मोठा वाढला आहे. शेतकरी बांधवांना (Farmer) मजूर टंचाईचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी बांधव यंत्रांच्या साह्याने शेतीची कामे करत असल्याचे चित्र आहे. यामध्ये ट्रॅक्टरचा (Tractor) देखील समावेश आहे.

अलीकडे शेतकरी बांधव शेतीची (Agriculture) सर्व कामे ट्रॅक्‍टरच्या साह्याने करत आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी एका विशेष ट्रॅक्टरची माहिती (Tractor Information) घेऊन हजर झालो आहोत.

कमी इंधन वापरासह एक शक्तिशाली आणि मजबूत ट्रॅक्टरची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो आज आपण स्वराज कंपनीचा मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor) विषयी जाणून घेणार आहोत. आज आपण स्वराज कंपनीच्या स्वराज 724 एक्स एम या छोट्या ट्रॅक्टरविषयी जाणून घेणार आहोत.

हा मिनी ट्रॅक्टर बागकामासाठी खूप चांगला मानला जातो. जर आपण त्याच्या मायलेजबद्दल बोललो तर मायलेजमध्ये हा एक चांगला ट्रॅक्टर आहे. स्वराज 724 XM मिनी ट्रॅक्टरची किंमत खूपच कमी आहे, जी लहान शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या ट्रॅक्टरच्या विशेषता आणि किमती बाबत सविस्तर. 

स्वराज 724 XM ऑर्चर्ड ट्रॅक्टर 2 सिलेंडर आणि 25 HP सह येतो, जो लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक उत्तम ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरमध्ये 1824 सीसीचे पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. या स्वराज ट्रॅक्टरमध्ये सिंगल क्लच ड्राय प्लेट क्लच आणि 6 फॉरवर्ड + 2 रिव्हर्स आहेत.

याशिवाय हा ट्रॅक्टर हेवी ड्युटी ऑइल इमर्स्ड ब्रेक्स आणि सुपर्ब मेकॅनिकल स्टिअरिंगसह येतो. त्याची डिझेल टाकी क्षमता 60 लिटर आहे आणि थंड करण्यासाठी वॉटर कूल दिलं आहे. स्वराजच्या या मॉडेलमध्ये एअर फिल्टरसाठी ड्राय टाईप, डस्ट अनलोडरसह ड्युअल एलिमेंट आणि 21.1 ची PTO HP क्षमता देण्यात आली आहे. या ट्रॅक्टरमध्ये ऑइल इमर्स्ड ब्रेक्स आणि RPM 1000 आहेत.

स्वराज 724 XM ऑर्चर्ड ट्रॅक्टरचा कमाल वेग 24.2 किमी प्रतितास आहे. स्वराज 724 X M ऑर्चर्ड ट्रॅक्टरचे वजन 1430 किलोग्रॅम आहे आणि ते 1000 किलो सहज उचलू शकते. स्वराज कंपनीने शेतकर्‍यांच्या सोयीसाठी स्वराज 724 XM ऑर्चर्ड ट्रॅक्टरमध्ये इतर उपकरणेही दिली आहेत, ज्याचा शेतकर्‍यांना त्यांच्या गरजेनुसार वापर करता येईल.

इतर उपकरणे- मोबाईल चार्जर, बंपर, बॅलास्ट वेट, टॉप लिंक, कॅनोपी, ड्रॉबार इ. देण्यात आले आहे. स्वराज 724 xm बाग ट्रॅक्टरची बाजारात किंमत सुमारे रु.3.95 लाख आहे. मित्रांनो येथे दिलेली किंमत ही एक्स शोरूम किंमत आहे त्यामुळे रोड ऑन प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe