Vanilla Cultivation : व्हॅनिला पिकाची शेती खोलणार यशाचे कवाड! अवघ्या तीन वर्षात शेतकरी राजा बनणार कोट्याधीश, शेतीची पद्धत्त समजून घ्या

Ajay Patil
Published:
vanilla cultivation

Vanilla Cultivation : देशात गेल्या अनेक वर्षांपासून पारंपारिक पीक पद्धतीला फाटा दिला जात आहे. शेतकरी बांधव (Farmer) आता नगदी (Cash Crops) तसेच बाजारात नेहमी मागणी मध्ये असलेल्या पिकांची शेती करत आहेत. जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना पीकपद्धतीत बदल करण्याचा सल्ला देत आहेत.

जाणकार लोकांच्या मते, पारंपरिक पीकपद्धतीत शेतकरी बांधवांना अधिक खर्च करावा लागतो आणि मिळणारे उत्पन्न (Farmer Income) खूपच कमी असते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी बाजारात मागणी मध्ये असलेल्या आणि नगदी तसेच औषधी पिकांची शेती (Medicinal Plant Farming) केली पाहिजे.

यामुळे आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी अशाच एका नगदी पिकाच्या शेती विषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो आज आम्ही व्हॅनिला या पिकाची (Vanilla Crop) शेती कशा पद्धतीने केली जाते आणि त्यातून शेतकरी बांधवांना किती नफा (Vanilla Farming Profit) मिळतो याविषयी सविस्तर माहिती घेऊन हजर झालो आहोत.

व्हॅनिला शेती

मीडिया रिपोर्टनुसार, केशरानंतर व्हॅनिला पिक जगातील दुसरे सर्वात महाग पीक आहे, कारण त्याची मागणी केवळ भारतातच नाही तर जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये आहे. आईस्क्रीम, केक, कोल्ड्रिंक, परफ्यूम आणि इतर सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.

एका अंदाजानुसार, जगात बनवल्या जाणार्‍या आइस्क्रीमपैकी 40 टक्के आइस्क्रीम केवळ व्हॅनिला फ्लेवरचे असते. या सर्वांशिवाय, व्हॅनिलाचे सेवन आरोग्यासाठी देखील अनेक बाबतीत फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत मोठी कमाई करण्यासाठी त्याची लागवड करणे हा शेतकऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. मात्र असे असले तरी, त्याची लागवड करण्यापूर्वी शेतकरी बांधवांनी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, या गोष्टी काय आहेत ते जाणून घेऊया.

व्हॅनिलाची लागवड करताना या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते बर…!

व्हॅनिलाची लागवड करताना सर्वात महत्वाचे म्हणजे तापमान लक्षात ठेवा. त्याच्या लागवडीसाठी आर्द्रता, सावली आणि मध्यम तापमान (म्हणजे 25 ते 35 अंश सेल्सिअस) आवश्यक आहे. अशा तापमानात त्याच्या पिकापासून चांगले उत्पादन मिळू शकते.

कोणत्याही पिकाच्या लागवडीसाठी शेतीजमीन महत्त्वाची भूमिका बजावते. याच्या लागवडीसाठी भुसभुशीत शेतीजमीन सर्वात योग्य मानली जाते. यासोबतच माती सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असावी. एवढेच नाही तर जमिनीचे पी.एच. मूल्य 6.5 ते 7.5 दरम्यान असावे.

व्हॅनिलाची लागवड करण्यासाठी, आपण त्याचे बियाणे दोन प्रकारे पेरू शकता. त्याची लागवड करण्यासाठी, कटिंग पर्याय हा पहिला मार्ग आहे आणि दुसरा पर्याय म्हणजे बियाणे पेरणे.

शेतकरी व्हॅनिलाची लागवड करून 3 वर्षांनी नफा घेऊ शकतात, कारण त्याचे पीक 3 वर्षानंतर उत्पन्न देऊ लागते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर शेती करून तीन वर्षांनी लाखोंची कमाई करून हळूहळू करोडपती होऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe