Wheat Farming : भावांनो गव्हाची शेती बनवणार धनवान ! ‘या’ जातीच्या गव्हाची शेती करा, लाखो कमवा

Wheat Farming : भारतात सध्या खरीप हंगाम सुरू असून येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. खरीप हंगामात परतीच्या पावसाने पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे.

अशा परिस्थितीत आता शेतकरी बांधव (Farmer) रब्बी हंगामात खरीप हंगामातील नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी झटणार आहे. मित्रांनो रब्बी हंगामात भारतात गव्हाची शेती (Wheat Farming In Maharashtra) मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील गहू (Wheat Crop) लागवड विशेष उल्लेखनीय आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी बांधव रब्बी हंगामात वेगवेगळ्या गव्हाच्या जातींची (Wheat Variety) शेती करत असतात. यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे. मित्रांनो येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला सुरुवात होणार असल्याने आज आपण गव्हाच्या एका जातीविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो आज आपण पुसा तेजस या गव्हाच्या जाती विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

पुसा तेजस जातीच्या गव्हाची विशेषता खालीलप्रमाणे :- 

पुसा तेजस गव्हाचे वैज्ञानिक नाव देखील HI-8759 आहे, जे ब्रेड आणि बेकरी उत्पादने तसेच नूडल, पास्ता आणि मॅकरोनी सारखी उत्पादने बनवण्यासाठी सर्वात योग्य आहे.

गव्हाची ही सुधारित जात लोह, प्रथिने, व्हिटॅमिन-ए आणि जस्त यांसारख्या पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्रोत आहे.  त्याचबरोबर या जातीमध्ये तांबेरा रोग होण्याची शक्यता देखील कमी असते.

पुसा तेजस गहू पिकाची पाने रुंद, मध्यमवर्गीय, गुळगुळीत आणि सरळ आहेत, शिवाय या जातीपासून अधिक उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.

पुसा तेजस गव्हाच्या जातीपासून पेरणीनंतर 115 ते 125 दिवसांत 65 ते 75 क्विंटल उत्पादन मिळू शकते. पुसा तेजस गव्हाच्या एक हजार दाण्यांचे वजन 50 ते 60 ग्रॅम असते. कडक आणि चमकदार धान्य असलेली पुसा तेज प्रजाती जितकी आकर्षक आहे तितकेच त्यापासून बनवलेले पदार्थही तितकेच स्वादिष्ट असतात.

निश्चितच ही जात अधिक उत्पादनासाठी ओळखली जाते. अधिक उत्पादन देण्यास ही जात सक्षम असल्याने शेतकरी बांधवांसाठी निश्चितच या जातीची शेती फायद्याचा सौदा राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe