शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! शेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्यासाठी कोण-कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? तज्ञांनी दिली मोठी माहिती

Ahmednagarlive24 office
Published:

Agriculture News : तुम्हीही शेतकरी आहात का किंवा शेतकरी कुटुंबातून येता का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते. शाश्वत पाण्याची उपलब्धता असली तर शेतीमधून चांगले उत्पादन मिळवता येते.

मात्र आपल्याकडे पाण्यासाठी मान्सूनवर अवलंबून राहावे लागते. आपल्याकडे कोरडवाहू क्षेत्र खूपच अधिक आहे. अशा परिस्थितीत शाश्वत पाण्यासाठी शेततळे खोदण्याचा सल्ला दिला जात आहे. शेततळ्यामुळे फळ वर्गीय पिकांची लागवड करता येते. याशिवाय इतर नगदी पिकांमधूनही चांगले उत्पादन मिळवता येते.

दरम्यान आज आपण शेततळे बनवलेल्या शेतकऱ्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. खरेतर अनेकांच्या माध्यमातून शेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्यासाठी कोण-कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? हा सवाल उपस्थित केला जात होता. यामुळे आज आपण याबाबत कृषी तज्ज्ञांनी सांगितलेल्या उपाययोजना थोडक्यात समजून घेणार आहोत.

शेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्यासाठी कोण-कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे ?

कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शेततळ्यातील बाष्पीभवन जर कमी व्हावे असे वाटत असेल तर शेततळ्याचा पृष्ठभाग हा लहान असला पाहिजे. कारण की द्रव्याचे आकारमान जेवढे अधिक असते तेवढे बाष्पीभवन अधिक होते.

यामुळे जास्त लांबी-रुंदी असणारे शेततळे बांधले की, शेततळ्यातील पाण्याचा हवेशी संपर्क वाढतो आणि यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होण्याची शक्यता असते. शिवाय, शेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्यासाठी शेततळ्याच्या बाजूने उंच व दाट झाडांचे कुंपण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

एवढेच नाही तर शेततळ्याच्या आजूबाजूने किमान तीन मीटर उंचीची भिंत बांधण्याचा देखील सल्ला देण्यात आला आहे. उपलब्ध माती व मुरमाचा वापर करून तात्पुरती 3 मीटर पर्यंतच्या उंचीची भिंत बांधण्यास काही हरकत नाही, यामुळे सुद्धा शेततळ्यातील बाष्पीभवन बऱ्यापैकी नियंत्रणात येऊ शकते असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.

सोबतच, निंबोळी किंवा एरंड या वनस्पतीजन्य तेलाचा वापर करूनही शेततळ्यातील बाष्पीभवन बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवले जाऊ शकते.

थर्माकोलचा वापर करूनही बाष्पीभवन रोखता येते. परंतु सरकारने प्लास्टिक आणि थर्माकोल वापरावर बंदी घातली आहे यामुळे याचा वापर शेतकऱ्यांनी करू नये.

केओलीन या रसायनाचा वापर केल्यास शेततळ्यातील बाष्पीभवन काही अंशी थांबवता येऊ शकते असा दावा केला जात आहे. एक कोटी लिटर पाण्यासाठी या रसायनाचा फक्त आणि फक्त तीन किलो भुकटीचा वापर करून शेततळ्यातील बाष्पीभवन रोखले जाऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe