Top Chilli Crop Variety:- भाजीपाला पिकामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक लागवड ही मिरची पिकाची केली जाते. आपल्याला माहित आहे की मसाल्याचा पदार्थ म्हणून मिरचीला ओळखले जाते व त्यामुळे मिरचीला वर्षभर मागणी देखील चांगली असते.
त्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये मिरची लागवडीमध्ये सातत्याने वाढ होत असून हळूहळू मिरची पिकातून शेतकरी चांगले उत्पन्न देखील मिळवताना आपल्याला दिसून येतात. परंतु मिरची पिकाचे तुम्ही व्यवस्थापन कितीही चांगले ठेवले तरी लागवडीसाठी निवडलेली जात किंवा वाण हा दर्जेदार उत्पादन देणारा असणे खूप गरजेचे आहे
व तेव्हाच कुठे तुम्ही केलेले व्यवस्थापनाचा फायदा होतो. त्यामुळे तुम्हाला देखील मिरची लागवड करायची असेल तर टॉप वाणांची निवड करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे या लेखात आपण अशाच काही मिरची पिकाच्या टॉप वाणाची माहिती बघणार आहोत.
नोव्हेंबरमध्ये लागवडीसाठी हे आहेत मिरचीचे टॉप वाण
1- पंजाब लाल- तुम्हाला जर मिरची लागवडीतून भरघोस मिरचीचे उत्पादन मिळवायचे असेल तर मिरचीचा पंजाब लाल हा वाण फायद्याचा ठरू शकतो.
या वाणापासून लाल मिरचीचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर निघते व साधारणपणे लागवड केल्यानंतर 120 ते 180 दिवसात काढणीस तयार होतो. मिळणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर पंजाब लाल या वाणाच्या लागवडीतून हेक्टरी 100 ते 120 क्विंटल उत्पादन मिळू शकते.
2- काशी मिरची- मिरचीचा हा वाण देखील लागवडीसाठी खूप उपयुक्त असून यापासून देखील भरघोस उत्पादन मिळते. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये मिरचीच्या लागवडीसाठी हा मिरचीचा वाण खूप फायद्याचा ठरू शकतो. यापासून हेक्टरी सुमारे तीनशे ते साडेतीनशे क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.
3- पंत चिली 1- मिरचीचा
हा वाण त्याची विशिष्ट चव आणि भरघोस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. लागवड केल्यानंतर सुमारे 60 ते 65 दिवसांनी काढणीस तयार होतो आणि उत्पादनाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर या वाणापासून हेक्टरी 100 ते 150 क्विंटल उत्पादन मिळू शकते. या वाणाची सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे हा मोझॅक आणि लिफ कर्ल यासारख्या विषाणूजन्य रोगांना प्रतिकारक आहे.
4- जवाहर मिरची-148- ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये हिरव्या मिरचीच्या लागवडीसाठी शेतकरी जवाहर मिरची 148 या वाणाची लागवड करू शकतात. या मिरचीचे उत्पादन बघितले तर हेक्टरी 85 ते 100 क्विंटल पर्यंत मिळते व वाळलेल्या मिरच्यांचे उत्पादन बघितले तर हेक्टरी 18 ते 25 क्विंटल पर्यंत मिळते.