Agri Related Business: ‘या’ पद्धतीने करा पैसे देणारी शेती! शेतीतील थोडासा बदल देईल तुम्हाला लाखोत नफा

Ajay Patil
Published:
agri releted business

Agri Related Business:- भारत एक कृषीप्रधान देश असून बहुसंख्य लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर आधारित आहे. परंतु शेती म्हटले म्हणजे आजही नुकसानीचा व्यवहार किंवा नुकसान देणारे क्षेत्र म्हणून बघितले जाते. परंतु जर व्यवस्थित पद्धतीने आणि व्यवस्थित पिकांची लागवड केली म्हणजेच विकेल ते पिकेल या तत्त्वाला धरून  जर पिकांची लागवड केली तर चांगला नफा शेतीतून मिळणे शक्य आहे.

आजचे उच्चशिक्षित तरुण देखील शेतीकडे वळताना दिसून येत असून असे तरुण कृषीशी संबंधित असलेला व्यापार करून देखील चांगल्या पद्धतीने पैसा मिळवत आहेत व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती देखील उत्तम प्रकारे तरुणांच्या माध्यमातून केली जात आहे. तंत्रज्ञानाच्या वापराने कमीत कमी खर्चात व कमीत कमी वेळेत चांगला नफा मिळवता येणे शक्य झाले आहे.

जर तुम्हाला देखील शेती व्यवसाय सुरू करायचा असेल व काही तरुण जर आता शेतीमध्ये नवीन असतील तर लेखामध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. शेती विषयक व्यवसाय म्हणजे शेतीशी संबंधित असलेला व्यवसाय करणे व यामध्ये शेतीमध्ये विविध पिकांची लागवड करून त्याला चांगल्या भावात  विकणे किंवा त्यावर वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया करून उत्पादनांची निर्मिती करणे याचा अंतर्भाव देखील कृषी व्यवसाय मध्ये होतो.

तसेच तुम्ही शेतीमध्ये जर सेंद्रिय पद्धतीचा वापर केला तर तुम्ही चांगला नफा देखील मिळवू शकतात. त्यामुळे अगदी सुरुवात करायची असेल तर तुम्ही कुठल्या पिकांची लागवड करून शेती करायला सुरुवात करू शकतात? याबद्दलची माहिती या लेखात बघू.

 या पिकांची लागवड किंवा शेतीशी संबंधित व्यवसाय ठरेल तुमच्यासाठी फायद्याचा

1- फुले शेती किंवा फुलांची लागवड फुलांची मागणी ही कायमच बाजारपेठेत असते. अगदी घरातील सदस्याचा वाढदिवसापासून तर एखाद्या व्यक्तीच्या पुण्यतिथी कार्यक्रमाप्रसंगी देखील फुलांची गरज भासते. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या पूजाअर्चा व इतर कार्यक्रमांना देखील फुले लागतात.

अशा पद्धतीने जर तुम्ही फुलांचा व्यापार केला किंवा शेतामध्ये फुलांची लागवड करून त्यांची विक्री केली तर चांगला नफा तुम्ही मिळवू शकतात. आजकाल ऑनलाईन युगामध्ये फुलांची विक्री ऑनलाइन पद्धतीने देखील केली जाते व खरेदी देखील ऑनलाइन होते.

तुम्ही चांगल्या पद्धतीचे दर्जेदार उत्पादन घेतले तर तुम्ही चांगला नफा फुल शेतीतून मिळवू शकतात. यामध्ये तुम्ही गुलाबापासून तर  जरबेरा तसेच अनेक प्रकारच्या फुलांची लागवड करू शकतात. फुल शेती ही कमीत कमी पैशात केली जाते व कमीत खर्चात चांगला नफा देण्याची क्षमता या शेतीमध्ये आहे.

2- बांबूचा व्यवसाय बांबूची शेती किंवा बांबूचे झाड खूप महत्त्वाचे असे झाड असून यापासून अनेक प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. अगदी घरात वापरल्या जाणाऱ्या टेबलापासून तर झोपडी बनवण्यापर्यंत अशा अनेकविध कामांसाठी बांबूचा वापर होतो. साधारणपणे एक बांबूच्या झाडापासून प्रत्येक वर्षाला पाच क्विंटल उत्पादन मिळाले

तरी शंभर झाडांपासून 500 क्विंटल तुम्हाला उत्पादन मिळू शकते. या माध्यमातून देखील तुम्ही लाखो रुपये मिळवू शकतात. त्यामुळे दीर्घकालीन उत्पन्नासाठी तुम्ही बांबूची लागवड करू शकतात.

3- कोरफड लागवड तसेच तुम्ही कोरफडीची लागवड देखील करू शकतात. साधारणपणे एक बिघा शेतीमध्ये तुम्ही 2500 रोपांची लागवड करू शकता व यासाठी तुम्हाला अवघ्या पाच ते सहा हजार रुपये खर्च येतो. कोरफडीचा उपयोग एलोवेरा ज्यूस तसेच अनेक प्रकारचे कोरफडीपासून उत्पादने देखील बनवले जातात.

प्रकारचे उत्पादने बनवणाऱ्या कंपन्यांना तुम्ही कोरफड विकू शकतात. तसेच ऑनलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही मार्केटमध्ये देखील विक्री करू शकतात. तीन ते चार वेळा सिंचनाचे सुविधा उपलब्ध असल्यास कोरफडीचे उत्पादन चांगले येते

व महत्त्वाचे म्हणजे यासाठी जास्त प्रमाणात खतांची आवश्यकता भासते. तसेच कोरफडीला कुठलाही प्राणी खात नसल्यामुळे प्राण्यांपासून देखील याचे नुकसान होत नाही. त्यामुळे कमीत कमी कष्टात आणि कमीत कमी खर्चात तुम्ही कोरफडीतून चांगला पैसा मिळवू शकतात.

4- नर्सरी व्यवसाय तुमच्या भागात जर बागायती जमीन असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची लागवड करू शकतात. बरेच व्यक्ती घराच्या बगीच्या मध्ये किंवा गॅलरीमध्ये देखील वेगळ्या प्रकारच्या छोट्या वनस्पतींची लागवड करतात. अशा स्थितीमध्ये तुम्ही नर्सरी उभारून वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची विक्री करून चांगला नफा मिळवू शकतात.

नर्सरीच्या माध्यमातून तुम्ही अनेक फुलांची रोपे तसेच भाजीपाला रोपांचा पुरवठा करून चांगला पैसा मिळवू शकतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या फळांच्या रूपांचे देखील पुरवठा तुमच्या नर्सरी मधून करून तुम्ही चांगला पैसा मिळवू शकता. तुमच्या रोपवाटिकेत तयार झालेली रोपे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने विकून देखील चांगला पैसा मिळवू शकतात.

याकरिता तुम्हाला तुमच्या रोपवाटिकेची एक वेबसाईट बनवणे गरजेचे राहील किंवा युट्युब  सारख्या इतर सोशल मीडिया प्लेटफॉर्मचा वापर करून तुम्ही तुमच्या नर्सरीचा प्रचार आणि प्रसार करू शकतात. तसेच जाहिरात मोठ्या प्रमाणावर केल्यास प्रत्यक्षरीत्या रोपवाटिका वर येऊन देखील रोपांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते व या माध्यमातून देखील तुम्हाला चांगला पैसा मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe