अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्र विकास योजनेमधून तालुक्यातील सात गावांमधील देवस्थानांना प्रत्येकी पाच लाखांचे तीन पथदिवे मंजुर करण्यात आल्याची माहीती आमदार नीलेश लंके यांनी दिली.पथदिव्यांसाठी सात गावांना एकूण १ कोटी ५ लाखा रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
देवस्थानांच्या परिसरात पथदिवे बसवण्यासंदर्भात आमदार लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. पवार यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना सातही गावांना प्रत्येकी तीन पथदिवे मंजूर करण्याची सूचना केली.
त्यानुसार पथदिवे मंजूर करण्यात आले आहेत. श्रीदेवी अंबिका देवस्थान (देवीभोयरे),श्रीभैरवनाथ देवस्थान (वाळवणे) ,श्रीक्षेत्र खंडेश्वर देवस्थान (अपधूप),काळभैरवनाथ देवस्थान (जातेगांव),गोरेश्वर देवस्थान (गोरेगाव),
पीर शेख बहुउद्दीन रहेदर्गा (दरोडी),शांतानंद महाराज मंदीर (रायतळे) या सात देवस्थानांच्या परिसरात पथदिवे बसवण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांप्रमाणे १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम