‘ह्या’ गावात आढळले १० बाधित,गावात पाच दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-नगर तालुक्यातील साकत खुर्द येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असन, गुरुवारी (दि.१) झालेल्या रॅपिड टेस्ट कॅम्पमध्ये गावातील ९ व वाळुंज येथील १ असे १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

गावात अजूनही मोठया संख्येने बाधित रुग्ण असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. गावात पाच दिवसांचा जनता कफ्र्यू पाळण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

तालुक्यात सध्या जास्त पेशंटची संख्या ही अकोळनेर, वडगाव गुप्ता, शिंगवे, अरणगाव, नेप्ती, नवनागापूर, खंडाळा, निंबळक, बुऱ्हाणनगर येथे असून,

आता साकत खुर्दचा नंबर लागला आहे. साकत खुर्द येथे कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे ग्रामस्थांनी गावात पाच दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता शुक्रवार, दि. २ ते दि. ६ या कालावधीत पहाटे सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत गाव बंद राहणार आहे.

या वेळेत नागरिकांनी कोव्हिड १९ नियमांचे काटेकोर पालन करावे, विनाकारण फिरू नये, असे आवाहन उपसरपंच बाबासाहेब चितळकर यांनी केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe