10 दिवस 100% कडक लॉकडाऊन? शनिवारी दुपारी होणार निर्णय

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-अतिवेगाने वाढणारा कोविड 19 संसर्गाची साखळी तोडण्यास राज्यात 10 दिवसांचा कडक लाॅकडाऊन घोषिक होऊ शकतो.

सलग 10 दिवस 100% कडक लॉकडाऊन घोषित करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

शनिवारी दुपारी होणाऱ्या या बैठकीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. राज्यात 2 एप्रिलपासून कडक निर्बंधासह मिनी लॉकडाऊन घोषित झाला. नागरिकांच्या कामधंद्यावर मोठा परिणाम होऊ नये म्हणून यावेळी फक्त विकेंडला कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.

पण पहिल्याच विकेंड लॉकडाऊनला राज्यात पुढील 10 दिवस कडक लॉकडाऊन लावण्याचा प्रस्ताव आला आहे. कारण पुढील 12 ते 18 एप्रिल दरम्यान दोन सार्वजनिक सुट्या आल्यात. त्यामुळे फक्त गुरूवार आणि शुक्रवार दोनच दिवस अधिकृत कामाचे असणार आहेत.

त्याला लागूनच पुढील शनिवार आणि रविवारचा विकेंड लॉकडाऊन सुरू होणार आहे. परिणामी दोन दिवसांसाठी नागरिकांची कामाच्या ठिकाणी गर्दी होणार. त्याएवजी सलग लॉकडाऊन केला

तर नागरिकांची गर्दी टाळून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येऊ शकते. राज्यात सध्या दररोज कोविड 19 संसर्ग बाधित रुग्णांची जी संख्या समोर येतेय ती पाहून राज्याचे आरोग्य विभागातील वरिष्ठ डाँक्टर राज्य सरकारला 100% लॉकडाऊनचाच सल्ला देत आहेत.

पण राज्यातील सर्व वर्गातील नागरिकांचं अर्थ चक्र पुन्हा कडक लॉकडाऊनमुळे डबघाईला येऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुवर्णमध्य साधत निर्णय घेत आहेत.

पण येत्या काही दिवसांत कोविड 19 संसर्ग परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्णय घ्यावा लागणार असं दिसतंय.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe