अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- सध्या काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी अद्यापही कोरोनाचा जोर कायम आहे. नगर तालुक्यातील जेऊर येथे देखील कोरोनाचा विस्फोट झाला होता.
या पार्श्वभूमीवर गावात १० दिवसांचा जनता कर्फ्यु पुकारण्यात आला आहे. जेऊर येथे मागील महिन्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झाला होता. येथे आजपर्यंत सुमारे ६५० रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.
तर २८ जणांचा बळी गेला आहे. सद्यस्थितीत आज ५५ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
जेऊर ग्रामस्तरीय कोरोना समितीने गावांमध्ये जनता कर्फ्यू पुकारून गावात कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केला आहे.
मागील १५ दिवसांपासून गावात जनता कर्फ्यू पुकारला होता. जनता कर्फ्यूची मुदत संपल्यानंतर कोरोना समितीच्या वतीने परत १० दिवसांचा रविवार दि. ३० मे पर्यंत जनता कर्फ्यु पुकारण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम