कुंभमेळ्यातील 102 भाविकांना कोरोनाची लागण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :- हरिद्वार येथे आयोजित महाकुंभमेळ्यात 102 भक्तांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये कुंभमेळा भरला आहे. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरं शाही स्नान पार पडलं. यावेळी पवित्र स्नानासाठी साधूंसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

कुंभमेळ्यासाठी लाखो साधू हरिद्वारमध्ये दाखल झाले आहेत. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाकडून भाविकांच्या चाचण्या करण्यात येत आहे दुसर शाही स्नान पार पडले असून तिसरे शाहीस्नान बुधवारी होणार आहे.

हरिद्वार येथे आयोजित हा कुंभमेळा आगामी 27 एप्रिल रोजी संपणार आहे. अलाहबाद म्हणजेच प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो.

दर तीन वर्षांनी एका ठिकाणी, अशा प्रकारे बार वर्षांत या चारही ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. कुंभमेळा आणि त्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व हे जगभरात मान्यता पावले आहे.

त्यामुळे कुंभमेळा पहायला जगभरातून देशी आणि विदेशातील पर्यटक ही या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी येतात.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News