अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी राजेश खटोड यांच्या घराचे खोदकाम करताना आढळून आलेल्या हंड्यात सापडलेल्या गुप्तधनात चांदीची ११ किलो ६ ग्रॅम वजनाची १ हजार २० नाणी सापडले आहेत.
याची किंमत सुमारे ८ लाख रुपये असून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पंचनामा करुन ते ताब्यात घेतले आहेत. बेलापूर गावात गुप्तधन सापडल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून दबक्या आवाजात सुरू होती.
सोने व चांदीने भरलेला भला मोठा हंडा मिळून आल्याची चर्चा गावात झाल्यानंतर बेलापूर येथील राजेश खटोड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर अर्ज केला. करताना गुप्तधन सापडले असून
सरकारी नियमानुसार पंचनामा करुन ते ताब्यात घेण्याची विनंती या अर्जात केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी भोसले यांनी श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना संबंधित ठिकाणी जाऊन ते गुप्तधन ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पाटील यांनी गावात येऊन बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून गुप्तधनाचा पंचनामा केला आहे. त्या पंचनाम्यात त्यांना ११ किलो ६ ग्रॅम वजनाची एकूण १ हजार २० नाणी आढळून आली असून हे गुप्तधन पाटील यांनी ताब्यात घेतले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम