अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- कोपरगाव तालुक्यात पुन्हा करोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज पुन्हा काही बाधित रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला असून
त्यात रॅपिड टेस्ट मध्ये 07 रुग्ण तर खाजगी लॅबमध्ये 74 आणि नगर येथील स्त्राव चाचणीमध्ये 36 रुग्णांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे.
बुधवारी एकूण 117 रुग्णांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
दरम्यान तालुक्यात आजपर्यंत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची आकडेवारी लक्षात घेतली असता दि. 17 मार्चपर्यंत 3 हजार 513 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून 3 हजार 144 रुग्ण बरे झाले आहेत.
आजपर्यंत एकूण 22 हजार 278 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्यांची टक्केवारी 15.77 आहे.तर मृत्यूचे प्रमाण 1.39 टक्के आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|