अहमदनगर जिल्ह्यातील त्या चेअरमनसह १२ जणांवर विनयभंग व अॅट्रॉसिटी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील कोथूळ या ठिकाणी जमिनीच्या वादातून झालेल्या कोथूळ सेवा संस्थेच्या चेअरमनसह १२ जणांवर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंगासह, अट्रॉसिटीचा गुन्हा बेलवंडी पोलिस ठाण्यात दाखल झाला असून गुन्हा दाखल होताच ३ आरोपींना अटक केली.

कोथूळ सेवा संस्थेच्या चेअरमनसह ९ आरोपी फरार झाले असून त्याचा शोध बेलवंडी पोलिस घेत आहेत. तालुक्यातील कोथूळ येथील रोहिदास गबाजी धस यांची कोथूळ येथील गट नंबर २११ ही शेती सुमारे दीड वर्षापूर्वी इसार पावती करून

फिर्यदिने विकत घेतली असताना ती जमीन दीपाली मनोहर लाटे यांना व सोनाली धनंजय लाटे यांचे नावावर रोहिदास धस व भरत धस यांनी परस्पर विक्री केली.

याबाबत श्रीगोंदे न्यायालयात दावा चालू असताना २३ जून रोजी फिर्यादी व फिर्यादीची सासू सुभद्रा, सासरा बाजीराव व मुलगा देवराज असे सर्वजन शेताचे बांधालगत असताना आरोपी मनोहर सुधाकर लाटे,

धनंजय सुधाकर लाटे, सुधाकर पांडुरंग लाटे, मिरा सुधाकर लाटे, सुभाष बापुराव लाटे, लक्ष्मण भगवान लाटे, रा. कोथूळ, रोहिदास गबाजी धस, विलास रघुनाथ धस, बाळू रघुनाथ धस, संजय हरिभाऊ धस, कैलास हरिभाऊ धस, मारुती किसन सातपुते,

नवनाथ मारुती सातपुते, रा. घाटकोपर, मुंबई यांनी एकत्र येऊन आम्ही इसार पावती केलेल्या शेतात ट्रॅक्टर घालून मुगाचे पीक पेरले.

फिर्यदीचे सासू, सासरे, मुलगा समजावून सांगत असताना त्यांनी फिर्यादी, सासू, सासरे, मुलाला जाती वाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण केली. तर धनंजय लाटे, मनोहर लाटे, कैलास धस,

विलास धस, रोहिदास धस यांनी फिर्यादीचा हात धरून विनयभंग केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोथुळ सेवा संस्थेचे चेअरमन धनंजय लाटे यांच्यासह १२ जनावर विनयभंगासह, अट्रोसिटीचा गुन्हा बेलवंडी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe