125cc Bikes : ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा ‘ह्या’ दमदार 125cc बाईक्स ; जाणून घ्या त्याची खासियत

Ahmednagarlive24 office
Published:

125cc Bikes :  तुम्ही देखील या महिन्यात 125 सीसी नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही बाईक्सबद्दल माहिती देणार आहोत ज्यामुळे तुमचे हजारो रुपये वाचतील आणि  तुम्ही चांगली बाईक खरेदी करू शकाल . चला तर जाणून घ्या ह्या दमदार बाईक्सबद्दल.

Honda Shine/Honda SP 125

होंडा शाइन ही भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाणारी बाइक आहे. या दोन्हीमध्ये 123.94cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्‍टेड इंजिन आहे. यासोबतच या दोन्हीला 5 स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. त्यांची किंमत 78,414 ते 82,214 रुपये आणि एसपी 125 ची किंमत 83,522 ते 87,522 रुपये आहे.

Hero Super Splendor/Hero Glamour 125

हिरो आजपासूनच नव्हे तर अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत लोकांच्या मनावर राज्य करत आहे. जर तुम्हाला 125cc मध्ये स्वतःसाठी बाईक घ्यायची असेल, तर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. हे 124.7cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिनसह येते. यासोबतच यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देखील मिळतो. त्याची किंमत 77,918 रुपये ते 81,818 रुपये आहे तर ग्लॅमर 125 ची किंमत 78,018 रुपये ते 89,438 रुपये आहे.

Bajaj Pulsar 125

हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. हे 124.4cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, DTS-i इंजिनसह येते जे 11.6 bhp पॉवर आणि 10.8 Nm टॉर्क जनरेट करते. हे 5 स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 87,149 रुपये ते 90,003 रुपये आहे.

Bring home the Bajaj Pulsar for just 35,000

हे पण वाचा :- 5G Smartphone : प्रतीक्षा संपली ! ‘या’ दिवशी लॉन्च होणार सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन ; किंमत आहे फक्त ..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe