पहिल्याच दिवशी 129 जणांना कोव्हिडची लस

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यात देखील लसीकरणालाच श्रीगणेशा करण्यात आला आहे.

नुकतेच श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात १२९ जणांंना कोव्हिडची लस देण्यात आली आहे. याबाबतची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. योगेश बंड यांनी दिली.

सविस्तर माहिती अशी कि, सोमवार दि. १ मार्च २०२१ पासून राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरवात झाली. त्याच धर्तीवर श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात कोव्हिड लस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

आरोग्य विभागातील ७२ जण, सरकारी अधिकारी फ्रंट लाईन वर्कर ३, वयोगट ४५ – ५९ या वर्गातील व्यक्ती तसेच ६० वर्ष वयोगटातील ५० वयोवृध्द अशा १२९ जणांना कोव्हिड लस देण्यात आली.

मंगळवारी कोविड लस देण्याच्या प्रक्रियेस गॅप देण्यात येऊन आज बुधवारी सकाळी पुन्हा कोव्हिड लस देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी पोर्टलवर लसीकरणासाठी नोंदणी करावी, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. योगेश बंड यांनी दिली.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe