‘या’ पोलीस ठाण्याच्या १४ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- सर्वोच्च न्यायालयाच्या अंतीम निर्णायाच्या अधीन राहून सेवा ज्येष्ठतेनुसार अहमदनगर जिल्ह्यातील अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. यामध्ये राहुरी पोलिस ठाण्यातील १४ कर्मचाऱ्यांचा नंबर लागला आहे.

त्यामुळे राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस भरती झाल्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती होत असते. तर काहींना त्यांच्या कामानूसार पदोन्नती मिळत असते.

२२ जुलै रोजी अहमदनगर पोलिस दलातील ५०३ कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली. यामध्ये राहुरी पोलिस ठाण्यातील १३ पुरूष व १ महिला असे एकूण १४ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली.

नारायण ढाकणे, संजय शिंदे, चंद्रकांत ब-हाटे, यांना हवालदार पदावरून सहाय्यक फौजदार पदी पदोन्नती दिली. तर संजय राठोड, दिनकर चव्हाण, वाल्मीक पारधी, संजय कारेगावकर, सोमनाथ जायभाय, विठ्ठल राठोड,

योहान सरोदे यांना पोलिस नाईक पदावरून पोलिस हवालदार पदावर पदोन्नती मिळाली. तसेच शहामद शेख, गणेश सानप, जालिंदर साखरे, उत्तरेश्वर मोराळे, आणि महिला कर्मचारी मंजूश्री गुंजाळ यांना पोलिस शिपाई पदावरून पोलिस नाईक पदावर पदोन्नती मिळाली.

डिवायएसपी संदिप मिटके व पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर स्टार लावले. तसेच त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षक निलेशकुमार वाघ, मधुकर शिंदे, तुषार धाकराव तसेच इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

तसेच विकास बाबासाहेब गुंजाळ हे राहुरी पोलिस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत असताना त्यांनी २०१७ मध्ये खातेनिहाय पोलिस उप निरीक्षक पदासाठी स्पर्धा परिक्षा दिली होती.

त्याचा निकाल २०२१ मध्ये लागला असून त्यात विकास गुंजाळ यांनी महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले.

ते सध्या नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकॅडमी येथे पोलिस उप निरीक्षक पूर्व प्रशिक्षण घेत आहेत. त्यामुळे राहुरी पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण असून अनेक जणांकडून त्यांचे सत्कार होत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe