अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-मागील दोन दिवसापासून राज्यभरासह नगर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सोमवारी दुपारच्या सुमारास नगर तालुक्यातील घोसपुरी येथे अचानक वीज पडून तब्बल १४ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.
मात्र सुदैवाने शेळीपालन करणारे शेतकरी बाळासाहेब अंबादास पादीर मात्र बचावले. याबाबत सविस्तर असे की,
गेल्या दोन-तीन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस होत आहे.
सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण तयार झाले होते. दुपारच्या सुमारास शहरासह ग्रामीण भागात वादळी वारे सुटले होते.
यात काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान नगर तालुक्यातील घोसपुरी येथील शेळीपालन करणारे शेतकरी बाळासाहेब अंबादास पादीर हे शेळ्या चारत होते.
वादळात अचानक वीज कडाडली व ती थेट त्यांच्या शेळ्यांच्या कळपावर कोसळली.यात तब्बल १४ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला.
तर पादीर या दुर्घटनेतून बालंबाल बचावले आहे. या घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सध्या कोरानामुळे आधीच सर्वसामान्य मेटाकुटीला आलेला असताना आता या आस्मानी संकटामुळे तर सर्वसामान्यांनी काय करावे असा मोठा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|