अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील श्री नागेश्वर मंगल कार्यालयात आ.निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१४ एप्रिलपासून सुरु झालेल्या शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरातील दोन हजार कोरोना बाधित रुग्णांपैकी तब्बल १ हजार ४१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
अशी माहिती येथील नोडल ऑफिसर डॉ.अन्विता भांगे, डॉ.मनीषा मानूरकर यांनी दिली. उर्वरितांवर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. येथील नियोजनासाठी आ. लंके हे सेंटरमध्येच ठाण मांडून आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी मागील महिन्यात दि.१४ एप्रिल रोजी अकराशे बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे.
आ.लंके हे दिवसरात्र येथेच थांबून आहेत. येथील रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांबरोबर बाधित रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल तपासणे, त्यांच्या शरीराचे तापमान मोजणे,
त्यांच्याशी चर्चा करून काय त्रास होत आहे हे जाणून घेणे. यातून तुम्हाला नक्की बरं करणार ही आत्मविश्वासाची भावना त्यांच्या मनात बळकट करणे,
ही कामे स्वत: आमदार लंके करीत आहेत. त्यामुळे रुग्णांमध्येही सकारात्मकता निर्माण होत आहेत. त्यातून त्यांना कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करण्यास बळ मिळत आहे.
आ.लंके यांनी निर्माण केलेल्या सकारात्मक वातावरणाने परिणामी भाळवणीच्या आरोग्य मंदिरात कोरोनालाही माघार घ्यावी लागली आहे.त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत.
ही सकारात्मक बाब सध्या या कोवीड सेंटरमध्ये अनुभवायला मिळत आहे.कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात घरवापसी करणाऱ्या परप्रांतीय, दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिक, पायी घराकडे चाललेले, अन्न,
पाण्यासाठी कासावीस झालेल्या जिवांसाठी सुप्यात मोफत भोजन व्यवस्था मागील वर्षी आ. लंके या केली होती.भाळवणीतील कोविड सेंटरमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारीही नेटाने काम करीत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|