अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- जिल्ह्यात शेतात आग लागल्याच्या अनेक घटना ताज्या असतानाच पुन्हा जिल्ह्यातून एका मोठ्या आगीची घटना समोर आली आहे. आजकल तालुक्यात अशीच एक दुर्घटना घडली आहे .
अकोले तालुक्यातील कौठवाडी शिवारात लागलेल्या आगीत 25 एकर शिवाराला आग लागल्याची घटना घडली. या आगीत विविध झाडे, सरपटणारे प्राणी, चार्याच्या पेंढया यांचे नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कौठवाडी येथील काशिनाथ साबळे, शंकर साबळे हे घरी नसताना अचानक सकाळच्या सुमारास 25 एकर शिवाराला आग लागली. त्यात आंबा, काजू, जांभूळ, बदाम, चिकू आदी 100 झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी झाले.
तर साबळे यांच्या खळ्यावर असणारे 250 पेंढे जळून खाक झाले. आग लागल्याचे पाहताच इंदिरा साबळे यांनी आरडा ओरडा केला. त्यांनी व त्यांचा मुलाने आग विझविण्यासाठी खूप प्रयत्न केले.
मात्र मोठे नुकसान या कुटुंबाचे झाले आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी जे.डी. गोंदके, सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांचेकडे तक्रार करण्यात आली असून अज्ञात व्यक्तींनी ही आग लावल्याचे शंकर साबळे यांनी सांगितले.
ही आग लागून मोठे नुकसान झाले असल्याचे पीडित साबळे म्हंटले आहे.दरम्यान कामगार तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|