दोन दिवसात तब्बल २९६ रेल्वे प्रवाशी होम क्वारंटाईन!

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-संवेदनशील राज्यातून दूर पल्ल्याच्या गाडयांनी जिल्हयात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची रेल्वे स्थानकातच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार शुक्रवारपासून तपासणी सुरू झाली आहे.

रविवार व सोमवार या दोन दिवसात दूर पल्ल्याच्या गाड्यांनी जिल्हयात दाखल झालेल्या आणखी २९६ प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. १७ प्रवाशांची तपासणी करण्यात आली.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या निगराणीत ही अंमलबजावणी होत आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढीस लागली.

या परिस्थितीचा अंदाज घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, दरदिवशी वाढत जाणाऱ्या बाधितांच्या आकड्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीपासून प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले.

दरम्यान, राज्य शासनाने नव्याने जारी केलेल्या निर्देशानुसार गुरुवारी अन्य राज्यातून रेल्वेद्वारे येणाऱ्या प्रवाशांची तपासणी  करण्याचे आदेश गुरूवारी कोरानासंदर्भात संवेदनशील असलेल्या केरळ, गोवा, गुजरात, राजस्थान,

उत्तराखंड या राज्यातून रेल्वेने जिल्ह्यात उतरणाऱ्या प्रवाशांची तपासणी कालपासून सुरू झाली आहे. दर बुधवारी धावणारी अहमदाबाद- बेंगलूर, दररोज धावणाऱ्या दिल्ली- बेंगलूर, मडगाव- निजामुद्दीन (येणारी -जाणारी) आणि पुणे- जम्मूतावी

या पाच एक्सप्रेस गाडयातील प्रवाशांची नगर, बेलापूर व कोपरगाव स्थानकावर स्क्रिनींग तपासणी होत आहे. ज्या प्रवाशाकडे आरटीपीसीआर रिपोर्ट नसेल त्यांची रॅपीड अँटीजेन टेस्ट केली जात आहे.

शुक्रवारपासून याची अंमलबजावणी आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे तपासणी सुरू झाली आहे. रविवारी तिन्ही स्थानकात एकूण ११६ प्रवाशी दाखल झाले. तर काल सोमवारी १८० प्रवाशी दाखल झाले.

सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. निर्देशानुसार रिपोर्ट  पॉझिटिव्ह आल्यास संबंधीतास कोविड केअर सेंटर मध्ये दाखल केले जाणार असल्याचे नोडल अधिकारी जितेंद्र पाटील म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe