अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- कांदा व्यापार्याची 35 लाख 63 हजार 884 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तामिळनाडूच्या कांदा खरेदी करणार्या व्यापार्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कोल्हार येथील महेश दत्तात्रय खर्डे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तामिळनाडू राज्यातील मनी पडवेत्तन वनियार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खर्डे, (रा. कोल्हार बु., ता. राहाता) यांचे भगवती ट्रेडर्स एपीएमसी मार्केट, (साकुरी, ता. राहाता) येथे कांदा विक्रीचा व्यवसाय असून ते त्यांच्याकडील कांदा हा ट्रान्सपोर्टमार्फत राज्यातील विविध भागात विक्री करण्यासाठी पाठवितात.
सदरचे व्यापारी हे कांद्याची विक्री करून त्याची रक्कम ही बँक अकाउंटवर जमा करतात व सदरचा त्यांचा सर्व व्यवहार हा फोनद्वारे व बँकेद्वारे चालतो.
त्यानुसार फिर्यादी यांनी त्याचे दुकानातील कांदा हा यातील आरोपी मनी पडवेत्तन वनियार यांच्याकडे एकूण-66 लाख,63 हजार ,884 रुपयाचा कांदा हा दि.27 जून 2018 ते 22 ऑगस्ट 2018 रोजीचे दरम्यान वेळोवेळी विक्रीस पाठविला होता.
त्यापैकी यातील आरोपीने कांदा विक्रीच्या एकूण रक्कमेपैकी 31 लाखांची रक्कम फिर्यादी यांचे खात्यावर जमा केलेली आहे. तसेच फिर्यादी यांनी कांदा विक्रीतील यातील आरोपी यांचे कडे शिल्लक असलेली
रक्कम 35,63,884/- रुपये ही आज देतो, उद्या देतो, असे म्हणुन रक्कम देण्यास टाळाटाळ केली आहे. या फिर्यादीवरुन राहाता पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम