कोरोनाचा विस्फोट झालेल्या ‘या’ तालुक्यात लशीचे 37 हजार डोस उपलब्ध

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे.

यातच गेल्या पंधरा दिवसांपासून राहाता तालुक्यात मोठ्या संख्येने करोना बाधित रुग्ण सापडत आहे. यातच राहाता तालुक्यात कोव्हीड प्रतिबंधात्मक लशीचे 37 हजार 20 डोस उपलब्ध झाले असून

जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लसीकरण केले असल्याची माहिती तालुका आरोग्य आधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के व घटना व्यवस्थापक तथा तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली. आतापर्यंत तालुक्यात 37 हजार 20 डोस उपलब्ध झाले आहेत.

शासन निर्देशाप्रमाणे प्रथम कोव्हीड योध्दे, ज्येष्ठ नागरिक आणि त्यानंतर वय वर्षे 45 पुढील नागरिकांना या लशीची उपलब्धता करुन देण्यात आली. आत्तापर्यंत यापैकी 27 हजार 112 नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली असून,

5 हजार 938 नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली आहे. दरम्यान तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ लागला होता. यामुळे प्रशासनाने अनेक कठोर पाऊले देखील उचलली आहे.

यातच आरोग्य विभागाच्यावतीने यापुर्वी गावांचे आरोग्य सर्वेक्षणही करण्यात आले होते. मागील परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच कोव्हीड संकटाचे दुसरे संक्रमण सुरू झाल्याने रुग्णांची संख्याही तालुक्यात वाढली.

आरोग्य आणि महसूल विभागाने संकटाच्या या दोन्ही टप्प्यात नागरिकांसाठी आरोग्याच्या सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe