5 State Elections Date 2022 : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा !

Ahmednagarlive24
Published:

5 State Elections Date 2022 : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकीची औपचारिक घोषणा शनिवारी झाली. या घोषणेसह पाच राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

– उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदान १० फेब्रुवारी रोजी
– सर्व पाचही राज्यांत ७ टप्प्यांत निवडणुका होणार.
– घरोघरी प्रचार करण्याठी केवळ पाच जणांनाच परवानगी असेल.
– १५ जानेवारीपर्यंत जाहीर सभांनाही मनाई राहील. व्हर्च्युअल प्रचारावर भर देण्याची सूचना.
– रोड शो, पदयात्रा, सायकल यात्रा यासाठी पूर्णपणे मनाई असेल.
– कोविडमुळे पाचही राज्यांत मतदानाची वेळ एक तासाने वाढवली.
– करोना स्थितीबाबत सर्व संबंधितांची मते विचारात घेतली आहेत.

रोड शो आणि रॅलींवर बंदी

डिजिटल, व्हर्च्युअल, मोबाईलच्या माध्यमातून प्रचार करावा, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. शारीरिक प्रचारासाठी पारंपारिक माध्यमांचा वापर कमी करा.

याशिवाय रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत कोणताही प्रचार, जनसंपर्क राजकीय पक्षांना करता येणार नाही. विजयी मिरवणूक काढली जाणार नाही. विजयी उमेदवार दोन लोकांसह प्रमाणपत्र गोळा करण्यासाठी जातील.

पक्षांना नियुक्त केलेल्या ठिकाणीच सभा घेण्याची परवानगी असेल. सर्व पक्ष आणि उमेदवारांना वचन द्यावे लागेल की ते कोविड गाईड लाईनचे काटेकोरपणे पालन करतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe