नेवासा तालुक्यातील ‘या’ गावात 8 दिवसांचा कडक जनता कर्फ्यू लागू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. कोरोनाचे संक्रमण गावपातळीवर होऊ लागल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी दरदिवशी वाढू लागली आहे.

यातच याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात येत आहे. नुकतेच नेवासा तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये 23 ते 30 मे 2021 पर्यंतच्या कालखंडामध्ये आठ दिवसांचा कडक जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

या कालखंडामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सुनीता विष्णू गायकवाड यांनी दिली.

जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, मेडिकल्स, स्वस्त धान्य दुकान, दूध संकलन केंद्र, पिठाची गिरणी वगळता गावातील सर्व दुकाने 100% बंद राहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe