साप दिसल्यामुळे 12 वर्षीय मुलाचा उंच कड्यावरून कोसळून मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- शेळ्या चारताना अचानक भलामोठा साप दिसल्यामुळे 12 वर्षीय मुलाचा उंच कड्यावरून कोसळून मृत्यू झाला आहे. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील घोरपाडवाडी येथे घडली आहे.

किसन गावंडे असे मृत मुलाचे नाव असून तो अकोला तालुक्यातील धामणगाव आवारी गावातील रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

किसन आपल्या काही मित्रांसोबत घोरपडवाडी परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेला होता. दरम्यान एका अचानक भलामोठा साप दिसला. सापाला पाहुन सर्वजन घाबरले व मिळेल त्या रस्त्याने पळायला सुरुवात केली.

यावेळी किसनचा पाय घसरला आणि तो कड्यावरून थेट दरीत कोसळला. किसनच्या डोक्याल्या गंभीर गुखापत झाली. त्यानंतर त्यास तात्काळ नाशकमधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र चार दिवसांनतर किसनचा मृत्यू झाला.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe