अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- आजकाल आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा नैराश्यातून आत्महत्या झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
यातच नगर तालुक्यात एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर तालुक्यातील सारोळा कासार
येथे राहणाऱ्या संकेत बाळासाहेब काळे (वय 22, रा.खडकी रोड, सारोळा कासार) या तरुणाने राहत्या घराच्या छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान आई-वडील व घरातील इतर कुटुंबिय शेतात कामासाठी गेलेले असताना सायंकाळी 5 च्या सुमारास त्याने घरातील छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
घराबाहेर बसलेल्या त्याच्या वृद्धा आजीच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तिने आरडाओरडा करुन शेजार्यांना बोलविले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता.
नगर तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर गावातील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याने आत्महत्या का केली याबाबत अद्यापही समजले नसल्याचे समोर येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम