अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील तिगाव शिवारात घडली आहे.
या अपघातात नारायण तात्याभाऊ निर्मळ (वय 27 वर्षे रा. काकडवाडी ता. संगमनेर) याचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, काकडवाडी येथील नारायण तात्याभाऊ निर्मळ हा युवक दुचाकीवरून संगमनेरच्या दिशेने प्रवास करीत होता.
दरम्यान तिगाव शिवारात अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात जबर मार लागून नारायण निर्मळ यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा केला.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. अपघातास कारणीभूत अज्ञात चालक मात्र वाहन घेवून पसार झाला. याप्रकरणी मयताचा भाऊ सुखदेव तात्याभाऊ निर्मळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम