चाळीस वर्षीय व्यक्तीने झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपवली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-  एका व्यक्तीने घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२४) सकाळी उघडकीस आली आहे. कचरू रामभाऊ गवळी (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

दरम्यान हि धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे घडली असल्याचं समोर आलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सदर युवक पाचेगाव ते पाचेगाव फाटा या रस्त्याच्या कडेला गेली पाच वर्षांपासून शेतात वस्ती करुन राहत होता.

बुधवारी (दि.२४) पहाटे पाच वाजेच्या सुमारास घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण नेमके समजले नाही. आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.

येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या अहवालावरून नेवासा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe