महिलांचा विनयभंग करणाऱ्या पेट्रोलपंप चालकावर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- पावसाचे पाणी अंगणात साचल्याने त्या पाण्याला वाट काढून देण्यासाठी गेलेल्या महिलांना शिवीगाळ करून त्यान्हा विनयभंग करणाऱ्या पेट्रोलपंप चालकाविरुद्ध गुन्हा श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान पोपट बारहाते असे पेट्रोलपंप चालकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूरमध्ये नुकत्याच झालेल्या पावसाने ठिकठिकाणी डबके साचले होते. यातच पावसाचे पाणी पेट्रोलपंशेजारी राहणार्‍या कुटुंबाच्या अंगणात साचले होते.

या साचलेल्या पाण्यात त्या कुटुंबाची 4 वर्षाची मुलगी बुडाली होती. दरम्यान वेळीच तिला पाण्याबाहेर काढून साचलेले पाणी काढून देण्यासाठी अडथळा ठरणारे दगड गोटे काढण्यासाठी फिर्यादी महिला व तिची सासू गेल्या होत्या.

त्यावेळी पेट्रोलपंप चालक पोपट बारहाते त्या ठिकाणी आला व म्हणाला, तुम्ही येथील दगडगोटे काढू नका.

त्यावर फिर्यादी महिला म्हणाली, आमच्या दारात खूप पाणी साचले आहे ते काढून देतो. त्याचा बारहाते यांना राग आला त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली.

तसेच महिलांचा विनयभंग केला. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून आरोपी पोपट बारहाते याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe