अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- राहाता तालुक्यातील चितळी येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी गावातील एका तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तरुण गावातून यापूर्वीच पसार झालेला आहे.
पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, आदिवासी समाजातील14 वर्षे वयाच्या मुलीचा गुरुवारी सायंकाळी एका घरात ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी यामृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. आरोपीचे नाव त्यांनी पोलिसांना सांगितले होते. दरम्यान मयत मुलीची आई मंगल आनंदा कांबळे यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान आकाश हा मुलीला लग्नाची मागणी घालत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शुक्रवारी रात्री चितळी गावात मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
घटनेपूर्वी मुलगी बेपत्ता झाली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे आकाश खरात याच्या घरात तिचा मृतदेह मिळून आल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान याप्रकरणातील आरोपी आकाश खरात हा तरुण गावातून यापूर्वीच पसार झालेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम