अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी सदैव तैनात असलेली खाकी म्हणजेच पोलीस प्रशासन सध्या अनेक प्रकरणांमुळे चर्चेत आहे.
लाचखोरी, कामातील निष्क्रियता यातच आता एका पोलीस कर्मचाऱ्याने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार शहरात घडला आहे.
महिलेला अश्लील मेसेज पाठवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने तोफखाना ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याविरोधात रविवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदास जयराम सोनवणे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोनवणे याने पीडित महिलेच्या मोबाइलवर अश्लील मेसेज पाठविले होते.
दरम्यान, यासंदर्भात सदर महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घटनेची शहानिशा केल्यानंतर सोनवणे याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्हा दाखल होताच सोनवणे याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी निरीक्षक गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|