डॉक्टर,अधिकारी, कर्मचारी यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- अहमदनगर शहरातील शासकीय रूग्णालयाच्या आवारात डॉक्टर व इतर अधिकारी, कर्मचारी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघा जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सफाई कामगार सचिन शाम बैद यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी दुपारी आरोपी उजागरे आणि मरकड यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणि शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आरोपी उजागरे आणि मरकड हे दोघे आले. त्यावेळी आरोपींनी डॉक्टरांसह इतर अधिकारी व कर्मचारी यांना अर्वाच्च भाषेत बोलून शिवीगाळ केली.

त्यानंतर आरोपी उजागरे फिर्यादी बैद व इतरांना म्हणाला, तुम्हाला माझे काय करायचे ते करा, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्ही आम्हाला आमच्या नातेवाईकांना का भेटू देत नाही. आमची अडवणूक का करता, तुम्ही पेशंटची काळजी घेत नसुन पेशंटला गळा दाबून मारून टाकता.

तुम्ही मला लेखी द्या की, इथून पुढे मृत्यु झाल्यास त्यास जबाबदार आमचे हॉस्पीटल राहील, असे बोलून फिर्यादी बैद व इतर कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरली. तसेच बैद यांच्यासोबत असलेल्या महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली.

या प्रकारानंतर आरोपी उजागरे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन तोफखाना पोलिस स्टेशन येथे नेले. त्यावेळी त्याला समज देवून सोडण्यात आले. तोफखाना पोलिसांनी सोडून दिल्यानंतर आरोपी उजागरे आणि मरकड यांनी पुन्हा शासकीय रूग्णालयात जावून

तेथील पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी मंगळवारी दुपारी पोलिस कर्मचारी बळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe