एक बनावट कॉल पडला लाख रुपयांना… नेमकं काय घडले जाणून घ्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- चोरी, गुन्हे यांच्यासह गुन्हेगार देखील अपग्रेड झाले आहे. यातच तंत्रज्ञांनाच्या युगात आता सायबर गुन्ह्याचा घटना वाढू लागल्या आहेत.

यात गुन्हेगारांकडून अनेकांना लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. असाच काहीसा प्रकार नगर शहरात घडला आहे. नगर शहरातील आगरकर मळा येथील एकाची जिओ प्रतिनिधी असल्याची बतावणी करून ९८ हजार ९९९ रूपयांची फसवणूक करण्यात आली.

ही रक्कम बँक खात्यातून लांबविण्यात आली. याप्रकरणी शरद माणिकराव कापकर (वय ४९, रा. आगरकर मळा, नगर) यांनी सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि,एका मोबाईल क्रमांकावरून जिओ प्रतिनिधी म्हणून बोलणाऱ्या इसमाने कापकर यांना अनी डीस्क नावाचे ऍप डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या एसबीआय खात्यातून ९८ हजार ९९९ रूपयांची रक्कम लांबविली.

या घटनेत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिस ठाणे गाठत या घटनेची फिर्याद दिली. या घटनेचा तपास सायबरचे पोलिस निरीक्षक भोसले करीत आहेत.

दरम्यान नागरिकांनी देखील अनोळखी कॉलपासून तसेच अशा फेक कॉल पासून सावध राहणे गरजेचे आहे. यामुळे आपली आर्थिक फसवणूक होण्यापासून टळू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe