‘त्या’ पीडित महिलांना पावणे दोन कोटींचे आर्थिक अनुदान मंजूर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- पूर्वी महिला बालविकास विभागाकडे असलेली मनोधैर्य योजना ही सुधारित योजना म्हणून कार्यान्वित करण्यात आली आहे.

या अंतर्गत पीडित महिलांना अर्थसाहाय्य देण्याचे अधिकार विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. मनोधैर्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील बलात्कार,

ॲसिड हल्ला व इतर अत्याचाराच्या बळी ठरलेल्या ८४ पीडित महिलांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत १ कोटी ७६ लाख २५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले असल्याचे प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी सांगितले.

या पीडित महिलांना अर्थसाहाय्य दिले जाते. दरम्यान २०२० ते आजपर्यंत या योजनेंतर्गत आलेली १०९ प्रकरणे निकाली काढत ८४ पीडितांना अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. कोरोनाकाळात मिळालेल्या या अर्थसाहाय्यामुळे पीडितांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पिडितेवर झालेल्या अत्याचाराचे स्वरूप पाहून प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत दिली जाते. पीडित महिलेने जबाब फिरविल्यास तसेच पोलीस, न्यायालय व जिल्हा मंडळास सहकार्य न केल्यास नुकसानभरपाई नाकारता येते.

या योजनेचा पीडितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन न्या. श्रीकांत आणेकर व सचिव रेवती देशपांडे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe