अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- मिरजगावात कोविड १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने घातलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६ दुकानदारांवर तसेच विनामास्क फिरणाऱ्या ७ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ही कारवाई कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. यामध्ये दोन मेडिकल्स, एक मोबाईल शॉपी, दोन ज्वेलर्सची दुकाने व एक बॅंगल्स दुकानचा समावेश आहे.
ही सहा दुकाने पुढील सात दिवसांकरिता सीलबंद करण्यात आली आहेत. तर विनामास्क फिरणाऱ्या ७ व्यक्तींना प्रत्येकी पाचशे रुपये दंड करण्यात आला. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक निर्बंध घातले आहेत.
शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मिरजगाव येथील सहा दुकानदारांवर आज दि.२५ रोजी कारवाई करण्यात आली. सदर दुकानांमध्ये दुकानदार व ग्राहक विनामास्क आढळून आले.
तसेच सोशल डिस्टन्स, सॅनिटाझर आदी बाबींची त्रुटी आढळून आल्या.मिरजगाव शहर व परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच व्यापार पेठेत कुठल्याही प्रकारचे नियमांचे पालन होत नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, तलाठी प्रियंका घुले, ग्रामविकास अधिकारी प्रताप साबळे, ग्रामपंचायत कर्मचारी दत्ता तुपे, शिवा गायकवाड, बापू घोडके, अशोक रायकर, मुख्तार सय्यद आदींसह पोलिस पथकाने केली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|