अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-मोक्कातंर्गत गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीने पोलीस सांगून दरोडा घालणारी टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
तोफीक सत्तर शेख (वय ३५ रा . काझीबाबारोड, वॉर्ड नं. २ श्रीरामपूर), साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन (रा. पापाजलाल रोड, वार्ड नं . २ श्रीरामपूर ), जावेद मुक्तार कुरेशी ( बजरंगचौक , श्रीरामपुर), शाम भाऊराव सांळुके (वय २० रा. खटकळी, बेलापुर ता. श्रीरामपूर),
आरबाज जाकीर मन्सुरी उर्फ पिंजारी (वय १९ रा . कुरेशी मोहल्ला, सुभेदारवस्ती जवळ , श्रीरामपूर) अशी पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, २७ मे रोजी ट्रकचालक श्रीधर सोनवणे हा ट्रकमध्ये भंगार घेऊन नगर येथून जात असताना दरोडेखोरांनी त्याला शनी शिंगणापूर फाट्याजवळ अडविले.
आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी करून दरोडेखोरांनी त्यास मारहाण करीत त्याच्याकडील ट्रक चोरून नेला. याप्रकरणी सोनवणे याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना एलसीबीच्या पथकाने या दरोडेखोरांना जेरबंद केले. अटक केलेले दरोडेखोर हे सराईत गुन्हेगार असून,
त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. सध्या ते जामिनावर बाहेर होते. आरोपींना पुढील कारवाईसाठी राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम