राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 31 जम्बो ऑक्सीजन सिलेंडरची भेट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाच्या प्राण जाऊ नये यासाठी मदतीचा हात पुढे करून राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत मॅककेअर हॉस्पिटलला 31 जम्बो ऑक्सीजन सिलेंडर देण्यात आले.

यावेळी आमदार संग्राम जगताप समवेत राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सोमा शिंदे, अंकुश मोहिते, रोहित कटारिया, ऑक्सीजन प्लांटचे संचालक रमेश लोढा,

निलेश बांगरे, रवी ठाकूर, संजू दिवटे, सतीश साळवे, गिरीश गायकवाड, रोहित केदारे, येशुदास वाघमारे, आनंद सकट, दीपक सरोदे, निलेश पाटोळे, अक्षय कराळे, योगेश बटे, महेश आठवले आदी.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की कोरोणाच्या संकट काळात ऑक्सिजन साठी सर्वांची पळापळ होत आहे परिस्थिती गंभीर असताना काही रुग्णांचा जीव ऑक्सिजन न मिळाल्याने गेल्याचे निदर्शनास आले आहे

मॅककेअर हॉस्पिटल मध्ये शासकीय नियमाप्रमाणे हॉस्पिटलमध्ये कार्य चालू आहे व सर्वसामान्य रुग्ण उपचार घेत आहे

हॉस्पिटल मध्ये ऑक्‍सिजनचा तुटवडा पडू नये यासाठी हा पुढाकार वाढदिवसाचा औचित्य साधून घेण्यात आला व प्रत्येकाने आपला वाढदिवस साजरा न करता हॉस्पिटलला मदतीचा हात देण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe